नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील सी.बी. गार्डन लगत असलेल्या लाल बहादूर शास्त्री नगरातील श्री शक्ती हनुमान मंदिराचे भुमीपुजन माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील सीबी गार्डन परिसरातील भाविकांनी यापूर्वी शक्ती महादेव मंदिरात कार्तिक स्वामींचे मंदिर उभारले. त्याच लाल बहादूर शास्त्री नगरातील एका स्वतंत्र जागेवर श्री शक्ती हनुमान मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी हनुमान मंदिराचे भूमिपूजन शिवसेना नेते (शिंदे गट) चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते झाले.यावेळी परिसरातील महिला व पुरुष भाविक आणि हनुमान भक्त भूमिपूजन समारंभास उपस्थित होते. संयोजन प्रीतमकुमार भोई, निलेश पाटील, रामकृष्ण मोरे, सुरेश भोई, महेश पटेल, विनायक पटेल, लिंबा पटेल, करण पवार, सुरेश कुमावत, प्रवीण शिवदे, मोतीलाल नुकते, निकलेश सोनार,संतोष पाटील,आणि लाल बहादूर शास्त्री नगर परिसरातील भाविक उपस्थित होते.








