नंदुरबार l प्रतिनिधी
एन.डी.आर.एफ तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सुरक्षा व व वैयक्तिक सुरक्षेसंदर्भात नंदूरबार येथील एस.ए.मिशन हायस्कूलमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.
एन.डी.आर.एफ तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सुरक्षा व व वैयक्तिक सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण
आपत्ती व्यवस्थापन कार्यालय पुणे अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार आणि शिक्षणाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ते 25 डिसेंबर दरम्यान शाळेच्या सुरक्षा व वैयक्तिक सुरक्षेसाठी नंदुरबार येथे पुणे येथील एन.डी.आर.एफ मार्फत 2 अधिकारी आणि 16 जावनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांमध्ये शाळा सुरक्षा व वैयक्तिक सुरक्षेसाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये नंदुरबार येथील एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील जिमखान्यात दुपारच्या सत्रात घेण्यात आले.
शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली एन.डी.आर.एफ मार्फत प्रशिक्षण देण्यात आले. ह्या वेळी सुरुवातीस एन.डी. आर.एफ चे मुख्यधिकारी राजू प्रसाद यांचे स्वागत शाळेचे उप मुख्याध्यापक विजय पवार यांनी केले आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे यांच्या स्वागत शाळेचे पर्यवेक्षक सी.पी बोरसे यांनी केले तसेच आलेल्या जवानांचे स्वागत शाळेचे पर्यवेक्षक मीनल वळवी व ज्येष्ठ शिक्षक अरुण गर्गे यांनी केले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील वसंत बोरसे यांनी प्रास्ताविक केले,
विद्यार्थ्यांना प्रथमोपचातंर्गत सी.पी.आर,इमर्जन्सी स्ट्रेचर,पूरग्रस्त परिस्थिती मध्ये सुरक्षेसाठी रिकाम्या बाटल्यांची माळ,नारळांची माळ तसेच थर्माकॉल आणि रिकाम्या माठांचे तोंड पॅक करून त्याचा पुरजन्य परिस्थितीमध्ये कसा उपयोग करावा याचे प्रशिक्षण देण्यात आले असे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनासमोर मांडण्यात आले व विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालन प्रा.सुनीता शिंदे यांनी केले व आभार मानले.








