नंदुरबार l प्रतिनिधी
पाचव्या ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट क्रीडा स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याचा खेळाडूंचा संघ नाशिकला रवाना झाला आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचा संघ सहभागी होईल.
नाशिक येथे दि.18 ते 20 डिसेंबर 2023 असे तीन दिवशीय पाचवी 19 वर्षातील ज्युनियर राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत नंदुबार जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे.
या जिल्ह्याच्या संघात व्यंकटेश गवळी, प्रणव माळी, अविनाश माळी, राजेंद्र गावित, साहिल गायकवाड, धीरज पाटील, अमेय पवार, भूषण पोटे, भूषण गावित, प्रथमेश पाटील, प्रेम चौधरी, गिरीश ठाकूर, हिमेश मालचे, योगेंद्र मालचे, कौस्तुभ चौधरी, कार्तिक चौधरी, तुषार पगारे हे खेळाडू नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
तसेच संघ कोच म्हणून शरीफ शेख आणि संघ मॅनेजर म्हणून ज्ञानेश्वर कोळी हे सोबत आहेत. दि.18 ते 20 डिसेंबर 2023 राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट क्रीडा स्पर्धा सुरू राहणार आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघातील खेळाडूंसह प्रशिक्षक हे नाशिक येथे रवाना झाले आहेत. याप्रसंगी नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ईश्वर चौधरी, सचिव संदीप खलाणे, सहसचिव हर्षबोध बैसाणे, योगेश निकुंभ, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते.








