तळोदा l प्रतिनिधी
टायगर ग्रुप चे खान्देश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर यांच्या विरूध्द कट रचून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून हे सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे व ऋषिकेश भांडारकर यांना तात्काळ मुक्त करण्यात यावे अन्यथा टायगर ग्रुपच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तळोदा टायगर ग्रुप चे शहराध्यक्ष शुभम खाटीक यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, धुळे येथील ऋषिकेश भांडारकर हे टायगर ग्रुप चे खान्देश विभागाचे अध्यक्ष आहे.व ते मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आले आहेत. व सदरील कार्यक्रमातून ते गोरगरिबांना देखील मदत करण्याचे काम करत असतात. कामापासून शासकीय निमशासकीय तसेच राजकीय लोकांना ऋषिकेश भांडारकर यांच्यापासून ईर्ष्या निर्माण झाली.
सदरहू काम करीत असताना गोरगरिबांच्या फायदा होत होता तर त्या कामामुळे इतरांचे मन दुखन्याचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही. अशा एकंदर परिस्थितीत देवपूर पोलीस ठाणे धुळे येथील कॉन्स्टेबल पंकज चव्हाण यांचे राजकीय लोकांशी संबंध देखील आहे. तसेच त्यामुळे त्यांच्या मनात खानदेश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर यांच्याविरुद्ध तीव्र ईर्ष्या निर्माण झाली होती म्हणून देवपूर पोलीस स्टेशन धुळे येथील कॉन्स्टेबल पंकज चव्हाण यांनी खानदेश अध्यक्ष ऋषिकेश भांडारकर यांना 6- 12- 2023 रोजी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोरून बेकायदेशीर रित्या अटक करण्यात आली.
पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन विचारपूस व वार्तालाप न करता त्यांना मारहाण सुरू केली. मारहाणी दरम्यान त्यांना जबरदस्त दुखापत झाली आहे. अटक केल्यापासून ते सिव्हिल हॉस्पिटल मध्ये भरती करेपर्यंत ऋषिकेश भांडारकर यांच्या आई पोलीस स्टेशनला होत्या. त्यांच्या समक्ष त्यांच्या मुलाला कुठलाही गुन्हा किंवा चूक नसताना देखील त्यांना पोलीस मार्फत देत असलेल्या वागणुकीबाबत त्यांच्या आईने विचारपूस केली असता त्यांच्या आईस देखील अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
सदरील कृत्य हे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय शिस्तीस धरून नाही. अशा एकंदरीत परिस्थितीत देवपूर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी पदाच्या गैरवापर करून ऋषिकेश भांडारकर यांचा कोणताही गुन्हा नसताना त्यांच्याविरुद्ध धुळे येथील देवपूर पोलीस ठाण्यामध्ये भा.द.वि.कलम 353, 323, 504, 506,अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सर्व खोटे गुन्हे दाखल केले आहे. म्हणून धुळे देवपूर पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी तसेच अधिकारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पदाच्या गैरवापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा टायगर ग्रुप च्या माध्यमातून राज्यभरात आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर सावन ठाकरे, दीपक पाडवी, रुपेश पाडवी, मयूर पवार,शुभम पाटील आदींच्या सह्या आहेत.








