नंदुरबार l प्रतिनिधी
दारिद्र्य रेषेखालील तसेच मध्यमवर्गीय रुग्णांवर पाच लाखापर्यंत विनाशुल्क उपचार व्हावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विशाल बाबा मोहन माळी मित्र मंडळाच्या वतीने नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातील नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे नुकतेच वाटप करण्यात आले.
शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या प्रेरणेने सदर उपक्रम राबविण्यात आला गेल्या 7 ऑक्टोबर रोजी विशाल बाबा मोहन माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माळीवाडा परिसरासह विविध भागातील नागरिकांची आयुष्यमान भारत कार्ड ची नोंदणी करण्यात आली होती. माळीवाडा तसेच बंधारहट्टी, काळी मजिद आदी भागातील नागरिकांनी नोंदणी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने कार्ड नोंदणी केली होती.
या नोंदणी नुसार नुकतेच माळीवाडा परिसरात असलेल्या योगेश्वरी माता मंदिर या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते कार्ड वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मोहन रायभान माळी नगरसेवक जगन्नाथ लोटन माळी माजी नगरसेवक निंबा मोहन माळी मुख्याध्यापक मनोज मोहन माळी यांच्यासह गुलाब माळी, विनोद माळी,हरिष माळी, ज्ञानेश्वर माळी, जीवन माळी ,राकेश माळी ,भूषण माळी, छोटू माळी ,विनोद पाटील, पंकज माळी व परिसरातील नागरिक पत्रकार बांधव उपस्थित होते.








