नंदुरबार l प्रतिनिधी
देवगिरी प्रांत प्रायोजित आणि जनजाती सुरक्षा मंचद्वारा आयोजित समस्त आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये २० डिसेंबर २०२३ रोजी नंदुरबार येथे महासंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर महासंमेलनाला विरोध दर्शविण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांच्यावतीने आज धरणे आंदोलनाचा करण्यात आला होता.
यावेळी विविध संघटनांतर्फे निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, दि.२० डिसेंबर २०२३ रोजी नंदुरचार येथे जनजाती सुरक्षा मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेला डी- लिस्टिंगचा कार्यक्रम तात्काळ रद्द करावा. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजामध्ये तेढ निर्माण करून जिल्ह्यातील शांतता संपवणाऱ्या तथा भांडणे लावून समाजामध्ये द्वेष निर्माण करणा या आदिवासी विरोधी संघटनांवर बंदी घालावी.
२० डिसेंबरच्या महासंमेलनातील सर्व विषय असंविधानिक असल्याने जिल्ह्यातील एकात्मता धोक्यात आणण्याचा प्रयत्न करणान्या आयोजकांवर रा.सु.का. अंतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई करावी. सदर कार्यक्रमातील मुद्दे हे माननीय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या निर्णयाच्या विरुद्ध असल्याने त्यांनी न्यायालयाच्या निर्णयांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कोर्टाच्या आदेशाचे अवमान केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये अ ५ वी आणि ६ वी अनुसूची तात्काळ लागू करावी. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजामध्ये भांडणे लावणाऱ्या आणि प्रक्षोभक भाषणे आणि निवेदन देणान्या संघटना आणि नेत्यांवर कारवाई करावी, समस्त आदिवासींना वनबंधू, बनवासी, गिरीजन, जनजाती, असे संबोधणाऱ्या संघटनांवर बंदी आणावी.
ह्या मुद्यावर शासन प्रशासनाने दखल घेतली नाही तर समस्त नंदुरचार जिल्हा आदिवासी बांधवांतर्फे संविधानिक पद्धतीने आमचे आंदोलन तीव्र करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी निवेदनावर दिलीप नाईक, रोहिदास वळवी, मालती वळवी, प्रियंका पाडवी, पंकज वळवी, ईश्वर वसावे, राजकुमार वळवी, रवी पाडवी, लालसिंग तडवी, रूपसिंग वळवी, वासुदेव गांगुर्डे यांच्यासह अन्य समाज बांधवांच्या सह्या आहेत. तहसीलदार नितीन गर्जे यांना निवेदन देण्यात आले.








