नंदुरबार l प्रतिनिधी
गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत नंदुरबार येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद अंधारे यांनी पाचवा क्रमांक मिळवला आहे.
नंदुरबार नाशिक येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.प्रसाद अंधारे हे नंदुरबार येथे गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहेत . गेल्या 2 वर्षात त्यांनी हृदयरोगाच्या जवळपास 700 अंजिओग्राफी आणि 350 चे वर अँजिओप्लास्टी नंदुरबार येथे केल्या आहेत . नंदुरबार सारख्या आदिवासी दुर्गम भागातील लोकांना ही सेवा खूपच मोलाची ठरली आहे . वेळेत अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळाल्याने अनेकांना जीवदान मिळाले आहे.रुग्णांच्या आरोग्यासाठी झटणारे हे डॉक्टर स्वतःच्या फिटनेस साठी तेव्हढेच जागृत आहेत आणि त्यासाठी लागणारा वेळ एव्हढ्या व्यस्त कामातूनही ते जरूर काढतात हे विशेष.
त्यांना शरीर सौष्ठवाची विशेष आवड आहे .ICN (I Complete Natuaral) ह्या गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शरीर सौष्ठव फिटनेस स्पर्धेत त्यांनी भाग घेतला . ही स्पर्धा देशात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते .देशातील जवळपास 150 स्पर्धकानी ह्यात भाग घेतला होता.या स्पर्धेत भाग घेण्यासाठी
गेले 6 ,7 महीने रोज 2 तास व्यायाम आणि डाएट पाळून त्यांनी विशेष तयारी केली होती ह्या स्पर्धेत हार्मोन्स आणि स्टिरॉइड्स वापरणार्यांना भाग घेण्यास बंदी आहे व त्याची आधी प्रत्येक स्पर्धकांची चाचणी घेतली जाते.अशा स्पर्धेत डॉ. प्रसाद अंधारे ह्यांनी स्ट्रीट मॉडेल गटात 5 वा क्रमांक ,आणि मेन्स फिजिक फर्स्ट टाइमर ,30 वर्षे वरील गटातही 5 वा क्रमांक पटकाविला .
त्याबद्दल सर्व थरातून त्यांचे कौतुक होत आहे. व्यायाम आणि फिटनेस ह्यावर फक्त उपदेश न करता स्वतः त्याचे उदाहरण घालून दिले.तसेच लाईफ स्टाईल मॅनेजमेंट या विषयावर ते नियमित वृत्तपत्र,रेडिओ, एफ एम रेडिओ, मुलाखती, व्याख्याने ई माध्यमातून समाजात नेहमी जागृती करत असतात.डॉ प्रसाद हे नंदुरबार येथील प्रसिद्ध डॉ. दीपक अंधारे ह्यांचे सुपुत्र आहेत.