नंदुरबार l प्रतिनिधी
8 ते 10 डिसेंबर 2023 दरम्यान सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय टेनिक्वाईट स्पर्धेत 17 वर्ष आतील वयोगटात नंदुरबार येथील श्रीमती डी. आर. हायस्कूलचा संघ विजयी होऊन सुवर्ण पदक प्राप्त केले .
या संघात शाळेचे मयूर पाटील, किरण मराठे, निखिल चौंडे, भावेश ढोले, समाधान माळी ह्या खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले.यापैकी मयूर दशरथ पाटील व किरण मधुकर मराठे या खेळाडूंची राष्ट्रीय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना शाळेचे मुखयाध्यापक पंकज पाठक यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबद्दल नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन परीक्षित मोडक, अध्यक्ष नरेंद्रभाई सराफ, उपाध्यक्ष राहुल पाठक, सचिव प्रशांत पाठक तसेच मुख्याध्यापक पंकज पाठक, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक विपुल दिवाण व हेमंत खैरनार क्रीडा विभाग प्रमुख जगदीश बच्छाव आदींनी कौतुक केले आहे.








