नंदुरबार l प्रतिनिधी
निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार यांनी अंकलेश्वर ते ब-हाणपुर रस्त्यालगत आमलाड शिवार हॉटेल सद्भावना समोर आमलाड ता, तळोदा जि. नंदुरबार. दोन इसमाच्या ताब्यातुन परराज्यातील मद्य व दोन वाहनासह रू. २५ लाख ८३ हजार ९२० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या गुप्त बातमीनुसार राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने अंकलेश्वर ते बन्हाणपुर रस्त्यालगत आमलाड शिवार हॉटेल सद्भावना समोर पत्रीशेडमधे येथे धाड टाकली यावेळी तेथे दोन वाहनात तसेच पत्रोशेडमधे परराज्यातील विदेशी मद्य व बियरचे एकुण २३३ बॉक्ससह 25 लाख 83 हजार 920चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत दोघांविरुद्ध करण्यात आली.
सदरची कार्यवाही दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नंदुरबार पी.जे. मेहता,निरीक्षक बी.एस. महाडीक, दुय्यम निरीक्षक पी.एस. पाटील, सा.दु.निरी. एम. के. पवार, जवान सर्वश्री राहुल डो साळवे, हितेश पी जेठे, भुषण चौधरी, मानसिंग पाडवी, हेमंत पाटील, धनराज पाटील, संदीप वाघ यांच्या पथकाने केली.याप्रकरणी सदर गुन्हयाचा तपास दुय्यम निरीक्षक पी.जे. मेहता करीत आहेत.








