म्हसावद। प्रतिनिधी
जम्मू काश्मीर येथे झालेल्या स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया मार्फत होणाऱ्या ६७ व्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत ईप्पी सांघिक प्रकारात महाराष्ट्रच्या मुलींच्या संघाने सुवर्ण पदक पटकाविले.
जम्मू काश्मीर येथे झालेल्या स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया मार्फत होणाऱ्या ६७ व्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत ईप्पी सांघिक प्रकारात महाराष्ट्रच्या मुलींच्या संघाने सुवर्ण पदक पटकाविले.या संघात आपल्या आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडू कु.अर्पिता महेंद्र काटे हिने चमकदार कामगिरी केली. तसेच ती नंदुरबार जिल्ह्यातील तलवारबाजी ह्या खेळातील पहिलीच राष्ट्रीय सुवर्णपदक प्राप्त करणारी खेळाडू ठरली आहे.
ती शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शहादा जिल्हा नंदुरबार ची विद्यार्थिनी आहे. यापूर्वी तीने १४ वर्षातील( मुली) शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत लातूर येथे कास्यपदक प्राप्त केले आहे.तसेच १७ वर्षातील(मुली)१६ वी कॅडेट राष्ट्रीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत हैदराबाद( तेलंगणा) येथे सुद्धा कास्यपदक प्राप्त केले आहे. व १९ वर्षा आतील शालेय राज्यस्तर शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथे वैयक्तिक ईपी या क्रीडा प्रकारात प्राप्त केले आहे. तिच्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल ती जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे .
तिच्या ह्या यशाबद्दल नाशिक विभागाचे रवींद्र नाईक उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा नाशिक विभाग नाशिक तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, बळवंत निकुंभ श्री. शिवछत्रपती पुरस्कार विजेते व नंदुरबार जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ.अरविंद कांबळे व उपाध्यक्ष वसीम शेख तसेच सचिव भागूराव जाधव तसेच क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी तसेच राज्य युवा शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष डॉ. मयूर ठाकरे तसेच छत्रपती संभाजीनगर येथील तिचे प्रशिक्षक सागर मगरे यांनी अर्पिताचे कौतुक केले आहे.