Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज: अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटचा जागीच मृत्यू

team by team
December 2, 2023
in राज्य
0
ब्रेकिंग न्यूज: अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटचा जागीच मृत्यू

म्हसावद । प्रतिनिधी

खेडले ता. तळोदा या ठिकाणी अज्ञात वाहनाने बिबटला जबर धडक दिल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला असल्याची घटना परिसरात घडली आहे.बिबटचा झालेल्या मृत्यमुळे पशुप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, २ डिसेंबर २०२३ रोजी खेडले ता. तळोदा या गावानजीक धानोरा कडे जाणाऱ्या रस्त्यावर मादी बिबट रस्ता ओलांडत असतांना तळोद्याकडे जात असलेल्या अज्ञात वाहनाने बिबटला जबर धडक दिल्याने बिबटच्या तोंडाला व मानेला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली.या दुखापतीमुळे बिबटचा जागीचा मृत्यू झाल्याची घटना खेडले शिवारात घडली आहे.

खेडले येथील नागरिक विजय पाटील, छोटूलाल पाटील, सतीश पाटील हे नियमित स्वरूपात मॉर्निंग वाकला खेडले येथून धानोरा रस्त्याकडे जात असतात. आपल्या ठरलेल्या वेळेला म्हणजेच सकाळी सहा वाजेला हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वाकला जात असतांना बिबट रस्त्यात मरून पडलेला त्यांना आढळून आला असता त्यांनी घरी आल्यानंतर या संदर्भात लागलीच तळोदा येथील वन अधिकारी यांना माहिती दिली. त्यांच्या या माहितीची दखल घेत तळोदा वन विभागाचे अधिकारी लक्ष्मण पाटील यांच्यासह वनपाल गिरधन पावरा, वनरक्षक वीरसिंग पावरा, राहुल कोकणी, जाण्या पाडवी,वाहनचालक सुरसिंग वळवी,दगडू पाडवी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी अजय मोलके सह घटनास्थळी पोहोचले व त्या ठिकाणी घटनेचा लागलीच त्यांनी पंचनामा केला.

पशुवैद्यकीय अधिकारी अजय मोलके यांनी सकाळी ठीक ८ वाजता शव विच्छेदन केले त्यात बिबट हा मादी असल्याचे निष्पन्न झाले असून वत्याचे वय साधारणतः तीन ते साडेतीन वर्ष असल्याचे त्या ठिकाणी सांगण्यात आले.ही घटना ५ ते ६ तास आधी घडल्याचे ही त्यांनी सांगितले.
पुढील प्रक्रिया पार पाडल्यानंतर बिबटला वनविभागाच्या वाहनात तळोदा येथे आणण्यात आले असून त्याच्यावर त्याचठीकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वन अधिकारी लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.
यावेळी बिबटला पाहण्यासाठी परिसरातील धानोरा तसेच खेडले, मोड,तऱ्हावद, मोरवड कढेल येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

उपजत क्रीडाक्षमतांना मार्गदर्शन, प्रशिक्षण लाभले, तर आदिवासी क्रीडापटूही देशस्तरावर चमकतील: खा. डॉ. हिना गावित

Next Post

नंदुरबार जिल्हयात रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे : प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add