Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

५६८ पदांच्या भरतीत आदिवासींना केवळ तीनच जागा

team by team
November 28, 2023
in राजकीय
0
५६८ पदांच्या भरतीत आदिवासींना केवळ तीनच जागा

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यस्तरीय जवान पदभरतीसाठी ५६८ जागांची जाहिरात काढलेली आहे.यामध्ये साडेसात टक्के आरक्षण असलेल्या आदिवासी समाजाकरीता केवळ ३ पदे आरक्षित ठेवून आदिवासींच्या आरक्षणावर हातोडा मारण्यात आलेला आहे.त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांची पदभरतीची जाहिरात रद्द करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, संविधानानुसार आदिवासींना शिक्षण,नोक-यामध्ये साडेसात टक्के आरक्षण आहे.परंतू महायुती सरकारमध्ये आदिवासींच्या घटनात्मक आरक्षणाला छेद देण्याचे काम सुरु असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीवरुन स्पष्ट दिसत आहे.राज्यात एकीकडे आरक्षणासाठी आंदोलनाचे वादळ उठलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारने आदिवासींच्या आरक्षणावर हातोडा मारल्याने बेरोजगार आदिवासी युवकांमध्ये संताप उमटला आहे.

उत्पादन शुल्क विभागात लघुलेखक,लघुटंकलेखक, जवान,वाहनचालक,चपराशी अशी पदे भरली जाणार आहेत.त्यात आदिवासींना केवळ ‘जवान’ या एकाच संवर्गातील ५६८ जागांपैकी केवळ ३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

या पदभरतीमध्ये अनुसूचित जाती,इतर मागास प्रवर्ग,विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती( ब,क,ड),आर्थिक दुर्बल घटक अशा प्रवर्गांना त्यांच्या आरक्षणाच्या टक्केवारी नुसार आरक्षित पदे उपलब्ध होत आहेत.परंतु आदिवासींची पदे कोणत्या आधारावर कमी करण्यात आली ? असा प्रश्न ट्रायबल फोरम संघटनेने उपस्थित केला आहे.

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

प्रवर्ग – आरक्षित पदे
एससी – ८१
एनटी( सी)- २५
ईडब्ल्यूएस- ५७
एसटी – ०३
व्हीजे ( ए )- १४
एनटी( बी) – १९
एनटी ( डी)- १३
ओबीसी – १२३
एसबीसी – ०८
खुला प्रवर्ग- २२५

५६८

मंत्रालयातून बिंदू चोरीला गेला
यापूर्वी छोट्या संवर्गातील बिंदूनामावलीमध्ये आदिवासींचा बिंदू क्रमांक २ वर होता. हा चोरीला जाऊन छोट्या संवर्गातील बिंदूनामावलीत आदिवासींना आठव्या क्रमांकावर फेकण्यात आले.राज्य सरकारने तात्काळ जाहिरात रद्द करावी.आणि छोट्या संवर्गातील बिंदूनामावली दुरुस्त करावी.
– नितीन तडवी जिल्हाध्यक्ष,
ट्रायबल फोरम नंदुरबार.

बातमी शेअर करा
Previous Post

रिकाम्या हाताने परतणार नाहीत; मुंबईला रवाना, झालेल्या कोळी बांधवांची भूमिका

Next Post

नंदुरबार रेल्वे स्थानकावरील थरार: उच्च दाबाच्या वाहिनीवर तरुण चढल्याने रेल्वे सेवा तासभर विस्कळीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add