नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि संसद रत्न खा. डॉ. हिना गावित यांनी विकासनिधी पोहोचवून लहानातल्या लहान गावांमध्ये काँक्रीटीकरण, पक्के रस्ते, जल कुंभ उभारणीच्या कामांचा धडाका वेगाने सुरू ठेवला आहे. त्या अंतर्गतच खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते गेल्या दोन दिवसात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूर तालुक्याच्या पळासनेर आणि तऱ्हाडी जिल्हा परिषद गटातील विविध गावांना जवळपास 25 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला.
जिल्हा परिषदेच्या त-हाडी (ता. शिरपूर) गटात १६ कोटी रुपये निधीतून साकारलेल्या विकासकामांचे लोकार्पण व नियोजित कामांचे भूमिपूजन खा. गावित यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्याचप्रमाणे पळासनेर गटातील उमर्दे, वकवाड, झेंडे अंजन, दुर्बड्या ई. ग्रामपंचायती अंतर्गत 8.50 कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.
या विविध भूमिपूजन प्रसंगी केलेल्या भाषणात खा. डॉ. गावित म्हणाल्या, की ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी भरभरून निधी देण्याचा प्रयत्न करीत आहे. आगामी काळातही तालुकाभरात मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, तालुक्यात उज्ज्वला योजनेतून ७८ हजार महिलांना मोफत गॅसची जोडणी, गरजूंना शबरी घरकुल योजना, ग्रामपंचायतींमध्ये ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजना, जलजीवन मिशन, बिरसा मुंडा गाव-पाडे जोडयोजना, पर्यटन तीर्थक्षेत्र योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, हर घर जल जोड योजना आदींच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात विकास केला आहे.
महिला बचतगटांना शबरी योजनेतून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य मिळवून दिले जात आहे. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या सहकार्याने न्यूक्लिअस बजेटमधून भजनी मंडळांसाठी साहित्य, क्रिकेट खेळाडूंसाठी किट, आदिवासी समाजाला सामुदायिक भांडी, मंडप, दुधाळ जनावरे, कुक्कुटपालनासाठी भरीव मदत देखील दिली जात आहे.
अशी होतील विकासकामे
जळोद येथे सहा कोटी ७१ लाख रुपये, तन्हाडी त.त. येथे दोन कोटी ९२ लाख रुपये, लोंढरे येथे एक कोटी ८७ लाख रुपये, अंतुर्ली येथे एक कोटी ४६ लाख रुपये, जवखेडा येथे ६३ लाख रुपये, भटाणे येथे एक कोटी २३ लाख रुपये, वरूळ येथे एक कोटी २७ लाख रुपयांची विकासकामे साकारण्यात येणार आहेत.उमर्दे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत पाड्यांना जलजीवन आणि रस्ते यासह सुमारे 2 कोटींहून अधिक रुपयांची कामे, दुर्बड्या ग्रामपंचायती अंतर्गत विविध विकास निधी मधुन मंजूर केलेल्या ४.४५ कोटी रुपयाच्या विकास कामे, वकवाड ग्रामपंचायत अंतर्गत गावपाड्यां साठी ठक्कर बाप्पा योजनेतून रस्ते, जलजीवन मिशन मधून 60 लाखाची पाणी योजना आदी दीड कोटीहून अधिक खर्चाची कामे, झेंडे अंजन ग्रामपंचायत अंतर्गत 50 लाखांची विविध विकास कामे.या निधीसाठी भाजपचे लोकसभा क्षेत्रप्रमुख डॉ. तुषार रंधे व राहुल रंधे यांनी पाठपुरावा केला होता.
त्या वेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, जिल्हा परिषद सदस्य भीमराव ईशी, संजय पाटील, वसंतराव पवार, जयवंतराव पाडवी, जुने भामपूर ग्रामपंचायतीचे गटनेते बाळासाहेब पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती दीपक गुजर, पंचायत समिती सदस्य राहुल पावरा, महेश सावळे, महेश पाटील, तुकाराम कोळी आदी उपस्थित होते.सुशील सोनवणे, शेखर माळी, गौतम पाटील, किरण पाटील, प्रवीण पाटील, नीतेश पाटील, धनंजय पाटील, प्रवीण शिरसाट, महेश पाटील, राहुल महाले, गजू पाटील, प्रफुल्ल पाटील, मयूर पाटील, समाधान पाटील, केतन भंडारी, जितू पाटील, राहुल ईशी आदींनी संयोजन केले.








