नंदुरबार l प्रतिनिधी
प्रकाशा येथे कार्तिक पौर्णिमेला रविवारी दि. २६ नोव्हेंबर रोजी तीन वाजून ५३ मिनिटांनी प्रारंभ होणार असून, तेव्हा येथील कार्तिक स्वामींचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
प्रकाशा येथील कार्तिक स्वामींचे मंदिर पूर्वाभिमुख काळ्या पाषाणात कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. हे मंदिर वर्षातून एकदा उघडते. २६ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे. दुपारी तीन वाजून ५३ मिनिटांनी हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे व २७ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता बंद होणार आहे.
मंदिराचे द्वार उघडल्यानंतर सुनील बापू भील हे सपत्नीक कार्तिक स्वामींची पूजा करतील. कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिरात गाभाऱ्यात शिवलिंग व गणपतीच्या मूर्ती आहेत. मंदिर उघडल्यापासून बंद होईपर्यंत भाविकांची गर्दी असते. यानिमित्त मंदिर परिसरात यात्रा भरविण्यात येते. कार्तिक स्वामींना मोरपीस भाविक चढवतात म्हणून मोरपीस विक्रेत्यांची दुकाने थाटलेली असतात.
या उत्सवासाठी श्री कार्तिक स्वामी भक्तगण समितीचे दिलीप भील, राजू मिस्तरी, रमेश माळीच, अरुण ठाकरे, कैलास माळीच, पुण्या भील, पिंटू भील, शत्रुघ्न माळीच, विलास माळीच, अंबालाल ठाकरे, सुनील भील, भुऱ्या भील, नवनाथ भील, कल्पेश सोनार, प्रवीण माळीच, राहुल कोळी, चेतन ठाकरे, दीपक भील, भगवान भील, राहुल ठाकरे, राज ठाकरे, प्रेम ठाकरे हे मंदिर सुशोभित करून परिसर स्वच्छ करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.








