Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रचाराच्या तोफा थंडावल्या, दिग्गजांची लागली प्रतिष्ठा पणाला

team by team
October 4, 2021
in राजकीय
0
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान
नंदूरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेचे ११ गट व पंचायत समितीच्या १४ गणांसाठी उद्या दि.५ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे . या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री १० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या . या निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा  पणाला लागली आहे . जिल्ह्यात ४५६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून २ लाख ८२ हजार ३८७ मतदार हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना सोमवारी साहित्याचे वाटप होईल .
नंदुरबार जिल्हा परिषदेचे ११ गट व पंचायत समितीच्या १४ गणांसाठी  पोटनिवडणुकीमुळे काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे . या पोटनिवडणुकीत अनेक दिग्गज मैदानात उतरले आहेत . दरम्यान जिल्ह्यात ४५६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून २ लाख ८२ हजार ३८७ मतदार हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख ३९ हजार ५४८ महिला आणि १ लाख ४२ हजार ८३९ पुरुष मतदार आहेत. प्रशासनातर्फे निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे उद्या दि.५ ऑक्टोंबर ला मतदान तर ६ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.रविवारी रात्री १० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या . या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झालेली दिसून आली.अनेक नेत्यांनी सभांचा धडाका लावला होता.या निवडणुकीत रघुवंशी व गावीत कुटुंब मैदानात उतरले आहे.आमदार डॉ . विजयकुमार गावित यांच्या कन्या तथा डॉ . सुप्रिया गावित यांनी कोळदा गटातून उमेदवारी केली आहे . त्यांच्या विरोधात आशा समीर पवार शिवसेनेच्या उमेदवार आहे . पंकज प्रकाश गावित कोपर्ली गटातून भाजपतर्फे रिंगणात आहे . हा गट माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र ॲड . राम रघुवंशी यांचा आहे . ॲड.  राम रघुवंशी हे शिवसेनेतर्फे रिंगणात आहेत . राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांची पत्नी रेखा सागर धामणे यांना भाजपातर्फे शनिमांडळ गटातून उमेदवारी मिळाली  या गटात शिवसेनेच्या जागृती सचिन मोरे रिंगणात आहेत . पालकमंत्री ॲड . के . सी . पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी या खापर गटातून काँग्रेसतर्फे रिंगणात आहे . त्यांच्या विरोधात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी रिंगणात आहेत . तसेच सातपुडा सहकारी कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या पत्नी
जयश्री पाटील लोणखेडा गटातून भाजपतर्फे रिंगणात आहेत . त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या गणेश पाटील यांनी उमेदवारी दाखल केली आहे .जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या पत्नी ऐश्वर्या रावल यांनी भाजपकडून कहाटूळ गटातून उमेदवारी दाखल केली आहे . या गटात काँग्रेसच्या मंदा रामराव बोरसे , शिवसेनेच्या प्रतिमा माळी रिंगणात आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाडळदा गटातून मोहन शेवाळे यांना उमेदवारी दिली आहे . याच गटात भाजपचे धनराज पाटील हे रिंगणात आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

दिवसाढवळ्या चोरट्यांनी लांबवले महिलेचे ६० हजार

Next Post

कर्मचाऱ्यांची सर्वंकष माहितीकोषात माहिती अद्ययावत करावी

Next Post

कर्मचाऱ्यांची सर्वंकष माहितीकोषात माहिती अद्ययावत करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add