नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ नंदुरबार वखार केंद्र यांच्याकडून वखार आपल्या दारी कार्यक्रम अंतर्गत शेती उत्पादक करणाारे शेतकरी व उत्पादक संस्था यांना शेतमाल साठवण व शेतमाल तारण कर्ज याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या नंदुरबार कार्यालयाचे साठा अधिक्षक व्ही. एच. राजपूत यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
वखार आपल्या दारी कार्यक्रम नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता ग्रामपंचायत सभागृह. तर सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील ग्रामपंचायत सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असेही, आवाहन श्री. राजपूत, यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.








