नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा उपाध्यक्षपदी चेतन जगदिश सोनार, नवापूर शहर उपाध्यक्षपदी रितेश मुकेश जयस्वाल यांची नियुक्ती केली असून तसे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व माजी आ.जयप्रकाश बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकार्यांची नियुक्ती केली आहे. मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी चेतन जगदिश सोनार, नवापूर शहर उपाध्यक्षपदी रितेश मुकेश जयस्वाल यांची नियुक्ती केली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी यांच्या हस्ते चेतन सोनार व रितेश जयस्वाल यांना देण्यात आले.
याप्रसंगी मनसेचे नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील कोकणी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, नवापूर तालुका उपाध्यक्ष जुबेर शेख, नवापूर शहराध्यक्ष रफिक शेख, दिनेश मराठे, ऋषी बाबा, योगेश चौधरी, अदनान खान, वासुदेव सोनवणे आदी उपस्थित होते.








