नंदुरबार l प्रतिनिधी
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मांजरे ता.नंदुरबार येथील १५ लाभार्थ्यांना सिंचन विहीरीसाठी ६० लाख तर २ लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत खडीकरण,मातीकरण करण्यासाठी ४७ लाख प्रमाणे १ कोटी साडेसात लाख रुपये मंजूर झाले असून, कामांच्या आदेशांचे वाटप शिवसेना (शिंदे गट) ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
नंदुरबार पंचायत समितीच्या माध्यमातून योजनेच्या लाभासाठी मांजरे येथील शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले होते. प्रस्तावाच्या मंजुरीसाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी पाठपुरावा केला. लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करीत गटविकास अधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
आमदार कार्यालयात मंगळवारी शिवसेना ( शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते रवींद्र राऊळ, भगवान पाटील,अनिता पाटील,प्रमिला पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील,दरबारसिंग राऊळ, पोपट पाटील,विनायक पाटील,सुरेश पाटील,संजय पाटील, राजेंद्र पाटील,भटा पाटील,दिलीप पाटील,हिरासिंग गिरासे या १५ लाभार्थ्यांना प्रत्येकी सिंचन विहिरीसाठी ४ लाखाप्रमाणे ६० लाख तर गावातीलच दोघा शेतकऱ्यांना शेतापर्यंत खडीकरण व मातीकरण करण्याच्या कामासाठी ४७ लाख ५१ हजार १८५ असे एकूण १ कोटी ७ लाख ५१ हजार रुपयांच्या कामांच्या आदेशाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पं.स सभापती दीपमाला भिल,पं.स सदस्य कमलेश महाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील, रमेश पाटील, रकासवाड्याचे सरपंच अविनाश भिल,जितेंद्र पवार, माजी पं.स सदस्य सुनील वसावे,मांजरेचे उपसरपंच समाधान पाटील आदी उपस्थित होते.








