नंदुरबार l प्रतिनिधी
पर्यावरण शेती आरोग्य व अध्यात्मासाठी गाईचे महत्व अनंत असून शेती स्वावलंबी करण्यासाठी गायीचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे असे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरीचे कृषी विभागाचे प्रमुख आबासाहेब मोरे यांनी नंदुरबार येथे आयोजित कृषी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी सांगितले.
नंदुरबार येथे आयोजित श्री.स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन ट्रस्टच्या वतीनेआयोजित खानदेश विभागीय कृषी महोत्सवाची सांगता करण्यात आली.

यावेळी आबासाहेब मोरे यांनी उपस्थित शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेरचे माजी आ. शिरीष चौधरी,आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गावित ,माजी उपनगराध्यक्ष ईश्वर चौधरी, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पवार ,माजी नगरसेवक विलास रघुवंशी, तुषार पटेल, मोनू शहा व जिल्हा केंद्राचे प्रमुख जीवन देवरे आदी उपस्थित होते. यावेळी आबासाहेब मोरे यांनी बोलताना सांगितले की, आपल्या जीवनात गायीच्या किती प्रभाव आहे हे गायीच्या संवर्धनातून आपणास कळेल गायीचे शेण ,गोमूत्रच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना आपली शेती स्वावलंबी करता येईल,
यामुळे शेतीचा मोठा खर्च वाचेल व गाईच्या संवर्धनाने पर्यावरण शेती आरोग्य अध्यात्म टिकून राहील. पशु व गोवंशाच्या माध्यमातून प्रात्यक्षिक स्वरूपात कृषी मेळाव्यात दाखवण्यात आले. या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानची माहिती होणे, शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणे, शेतकऱ्यांच्या खर्च कमी करणे तसेच शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे विवाहाच्या समस्या ,घरगुती गरजा या सर्व कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या.शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची माहिती व्हावी,
त्याचा लाभ व्हावा हे प्रात्यक्षिक स्वरूपात मांडण्यात आले .शेतकऱ्यांनी शेती स्वावलंबी करावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांसह सर्व घटकांच्या लोकांनी उपस्थिती दर्शवली, पक्षभेद ,जातीभेद ,धर्मभेद विसरून हा मेळावा यशस्वी झाला आहे. जिथे सरकार पोहोचले नाही तिथे सेवेकरी पोहचले आहे .श्री स्वामी समर्थ सेवेकरी हे सेवाभावी काम करून शेतकऱ्यांना व सेवेकरीना वेळ देत आहे .असे दिंडोरी येथील कृषी विभाग प्रमुख आबासाहेब देवरे यांनी सांगितले.








