Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दरोड्यावेळी धाडस दाखविणाऱ्या दिशा अग्रवाल हीचा अग्र विर पुरस्काराने सन्मान

team by team
October 31, 2023
in सामाजिक
0
दरोड्यावेळी धाडस दाखविणाऱ्या दिशा अग्रवाल हीचा अग्र विर पुरस्काराने सन्मान

नंदुरबार l प्रतिनिधी

दरोडेखोरांकडून घरात टाकला जाणाऱ्या दरोड्यावेळी सतर्कता दाखवित घराबाहेर येऊन दिशा भरत अग्रवाल या मुलीने दरोडेखोरांच्या प्रकाराबाबत काका व परिसरातील नागरिकांना सांगितल्याने दरोडेखोर जेरबंद झाले. म्हणून नंदुरबार जिल्हा अग्रवाल समाजाच्या वतीने विसरवाडी येथील दिशा भरत अग्रवाल या मुलीला अग्र विर पुरस्कार २०२३ देवून सन्मानीत करीत तिच्या धाडसाचे कौतुक करण्यात आले आहे.

नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील भरत अग्रवाल यांच्या घरी काही दिवसांपूर्वी दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना घडली होती. रात्री घरात आलेल्या दरोडेखोरांनी भरत अग्रवाल व त्यांचे पत्नीचे हातपाय बांधून दागदागिने चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वडिलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येताच मुलगी दिशा भरत अग्रवाल हिने घरात दरोडेखोर आल्याचे पाहून सावधानता दाखवीत घराबाहेर धाव घेतली. तसेच काका व परिसरातील नागरिकांना घरात दरोडेखोर असल्याचे सांगून दिशा या मुलीने दाखविलेल्या धाडसामुळे घरातील दरोडेखोरांना परिसरातील नागरिकांसह विसरवाडी पोलिसांनी पकडले.

त्यामुळे दरोडेखोरांकडून होणारा अनुचित प्रकार टळला. दिशा अग्रवाल या मुलीच्या धाडसामुळे दरोडेखोर जेरबंद झाले आहेत. म्हणून नंदुरबार जिल्हा अग्रवाल समाजाच्या वतीने घरात पडलेल्या दरोडाच्या घटनेवेळी धाडस दाखविणाऱ्या दिशा भरत अग्रवाल या मुलीचा सत्कार करण्यात आला आहे. विर अग्र पुरस्कार २०२३ हा पुरस्कार देऊन दिशा भरत अग्रवाल हिचा सन्मान करण्यात आला आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनचे संघटन मंत्री रतनलालजी अग्रवाल, नंदुरबार जिल्हा अग्रवाल समाजाचे अध्यक्ष दिलीप अग्रवाल, नंदुरबार जिल्हा अग्रवाल समाजाचे युवा अध्यक्ष तथा उद्योजक नितेश अग्रवाल, अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाचे नंदुरबार जिल्हा सचिव तथा नंदुरबार जिल्हा अग्रवाल समाजाचे युवा सचिव गोटू अग्रवाल, सुनील अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, संदीप (बधू) अग्रवाल, प्रकाश अग्रवाल, संदीप सुभाषचंद्र अग्रवाल, पिकेश अग्रवाल, ॲड.मोहित अग्रवाल आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

फिटनेस प्रमाणपत्रासाठी 10 हजार लाच मागणाऱ्या दोघांना जिल्हा रुग्णालयात रंगेहाथ अटक

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या कामांना गती द्यावी : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add