नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे राजकारण सध्या गढूळ झाले आहे. प्रत्येक समाज आरक्षणासाठी मागणी करीत आहे. केंद्र शासनाने घटना दुरुस्ती केल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. याचबरोबर बिहारप्रमाणे महाराष्ट्रात देखील जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी आरक्षण अधिकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे, नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश वाघ, धुळे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, अनिल नळे, उपस्थित होते.
याप्रसंगी समता परिषदेचे प्रादेशिक उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक म्हणाले की आरक्षण कायदेशीरदृष्ट्या किचकट असून स्वातंत्र्याच्या 75 वर्षातही बहुजन समाजाला दुर्लक्षित ठेवण्यात आले.क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांनी इंग्रजांकडे मागणी केली होती.मात्र स्वातंत्र्यानंतर राजकीय षडयंत्र म्हणून पाडण्यासाठी आता वेळ आली आहे.बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहापासून पिढ्यानपिढ्या काम ठेवत राबवून घेण्यात आले.मात्र आता खऱ्या अर्थाने लढा देण्यासाठी सर्व ओबीसींनी संघटित होण्याची गरज आहे.या महामेळाव्यात एकूण नऊ ठराव मंजूर करण्यात आली असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदनाद्वारे पाठविण्यात येणार आहे.
महामेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.बहुजन समता परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी महामेळाव्याच्या आयोजनाची भूमिका विशद केली.
प्रास्ताविक रामकृष्ण मोरे यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र जाधव यांनी तर आभार या.ना. पाटील यांनी मानले.
या महामेळाव्यास शहादा येथील माजी नगरसेवक सुपडू खेडकर, अरविंद कुवर, माजी जि.प. अध्यक्ष वकिल पाटील, माजी नगरसेवक जगन्नाथ माळी, मोहन माळी, निंबा माळी, धर्मेंद्र पाटील, मोहिनिराज राजपूत, महादू हिरणवाळे,निलेश माळी, प्रतिभा चौधरी, अलका जोंधळे,प्रा. ईश्वर धामणे, आशा सोनवणे, प्रमिला पाटील आदी उपस्थित होते.ओबीसी आरक्षण महामेळावा यशस्वीतेसाठी मधुकर माळी,पितांबर खैरनार, पुंडलिक माळी, राजेंद्र वाघ,गोरखनाथ बावा, प्रकाश भोई,वासुदेव माळी आणि समता परिषदेसह ओबीसी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.








