नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे श्री मोठा मारुती मंदिरात हिंदू जनजागृती च्या वतीने शस्त्र पूजन करण्यात आले यावेळी यावेळी उद्योजक नितेश अग्रवाल, श्री मोठा मारुती मंदिराचे कार्याध्यक्ष अशोक चौधरी, रविंद्र पवार, कल्याण पाटील तसेच माजी सैनिक अरविंद निकम यांची वंदनी उपस्थिती लाभली यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले
पुरोहित विलास जोशी यांनी मंत्रोपचार केले
विजयादशमीचा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय. हे पर्व अधर्मावर धर्माची, असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतिक मानले जाते. याच दिवशी शस्त्रपूजन केले जाते. आपला इतिहास सांगतो कि महिषासुर रूपी राक्षसाचा हाहाकार सर्वत्र माजला होता. त्यावेळी सर्व देवतांनी आदिशक्तीची उपासना करून तिला महिषासुराचा नाश केला.
विजयादशमीच्या दिवशीच प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून अधर्म संपवला. याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपवून पुन्हा एकदा शस्त्र हाती घेतले होते. आजच्या विजयीदिनी हिंदूंच्या मनातील शौर्याची भावना पुन्हा प्रज्वलित होऊ दे, असुरी वृत्तीच्या विरूध्द सनदशीर मार्गाने लढण्यासाठी तूच आम्हाला देवतांचे बळ दे. या शस्त्रपूजनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांमधील शौर्य जागृत होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समर्पित होता येऊ दे, अशी आदिशक्ती माता तुझ्या चरणी प्रार्थना आहे. यावेळी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा आकाश गावित यांनी घेतली.
यावेळी शिवप्रतिष्ठानचे नरेंद्र तांबोळी,देवा कासार, दिग्विजय ठाकरे, हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील व विविध हिंदू संघटनांचे संघटनांचे पदाधिकारी व महिला भगिनींची उपस्थिती लाभली या उपक्रमासाठी सुमित परदेशी,आकाश गावित, हर्षल देसाई, जितेंद्र मराठे यांनी नियोजन केले.








