नंदूरबार l प्रतिनिधी
द्वारकाधिश साखर कारखाना संचलित आदिवासी सहकारी साखर कारखाना लि.डोकारे ता.नवापुर जि.नंदूरबार येथे गळीत हंगाम 2023 – 2024 चा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर कारखान्याचे चेअरमन भरत माणिकरावजी गावित आणि संचालिका सौ.संगीताताई भरत गावित यांच्या हस्ते विधिवत पूजन करून संपन्न झाला.
डोकारे आदिवासी सहकारी कारखान्याच्या कारखाना साईटवर कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद बंधू भगिनी, ऊस उत्पादक शेतकरी बांधव ,ऊस वाहतूक चालक मालक, सन्मानिय उपस्थित मान्यवर व कर्मचारी कामगार वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन भरत गावित व संचालिका सौ.संगीता गावित यांच्या हस्ते इष्टदेवतांची स्थापना करून, यज्ञ कुंड प्रज्वलित करून विधिवत पूजन व आरती करण्यात आली.
त्यानंतर बॉयलर अग्निप्रदीपन भरत गावित, सौ.संगीताताई गावित, सचिन सावंत व युवा उद्योजक धनंजय भरत गावित यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी द्वारकाधिश साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन सावंत, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन जगन कोकणी,
संचालक हरिदास गावित,आलू गावित, देवराम गावित, विनोद नाईक, सीताराम ठाकरे, रमेश गावित, लक्ष्मण कोकणी, रावजी वळवी, संचालिका पुष्पाताई गावित, रुद्राबाई वसावे, मीराबाई गावित, तसेच मनोजभाई अग्रवाल, जनरल मॅनेजर बी.सी. कर्पे,मुख्य कार्यकारी संचालक शिवाजीराव भालेराव, तज्ञ संचालक जयवंत जाधव, दिलीप गावित सर, अजय गावित, परवेज सैय्यद,आदींसह कर्मचारी ,कामगार वृंद उपस्थित होते.








