Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी रात्रभर फिरून जिल्ह्यात राबविले कोंबींग आपरेशन, ४७ गुन्हेगारांना अटक, टँकर चोरीही उघडकीस, गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

team by team
October 3, 2021
in क्राईम
0
लोणखेडा येथे अल्पवयीन बालकाकडुन अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी स्वत: रात्रभर रस्त्यावर उतरुन काल दि.२ ऑक्टोंबर रोजी रात्रभर नंदुरबार जिल्ह्यात कोंबींग आपरेशन राबवून तसेच नाकाबंदी करुन, गुन्हेगार वस्त्यांत घुसुन पोलीसांनी गुन्हेगारांना चेक करुन नावावर वारंट असलेल्या तब्बल ३७ गुन्हेगारांना अटक केल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारांत खळबळ उडाली असून अनेक छोट्या मोठ्या गुन्हेगारांनी जिल्ह्यातून काढतां पाय घेतला आहे.याशिवाय रात्री गुन्हे करण्याच्या बेतात असलेल्या १० जणांना अटक करुन त्यांच्यासह मुंबई पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे कारवाई केली.या कारवाईत एक टँकर चोरीही उघडकीस आला आहे.यासह एका १७ वर्षाच्या अल्पवयीन आरोपीकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.नागरीकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.जि.प. व पंचायत समिती पोटनिवडणूकांच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.यापुढेही गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगीतले.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक व नवरात्रौत्सव दरम्यान समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ऑपरेशन ऑल आऊट राबविण्याबाबत नियोजन केले . ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार , फरार , पाहिजे , फेर अटक आरोपी , हिस्ट्रीशिटर्स , गँग हिस्ट्रीशिटर्स , अवैध शस्त्रे बाळगणारे , रात्री घरफोडी करण्याच्या उद्देशात असलेले , चोरीच्या वस्तू बाळगणारे रात्री संशयीतरीत्या फिरणारे , कारागृहातुन सुटुन आलेले आरोपी , स्टेडिंग वॉरंट , नॉन बेलेबल वॉरंट , बेलेबल वॉरंटमधील आरोपीतांचा शोध घेवुन जास्तीत जास्त गुन्हेगार ताब्यात घेवुन त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्या बाबतच्या तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना  पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या . दि.२ ऑक्टोंबरच्या रात्री ऑपरेशन ऑल आऊट सुरु करण्यात आले.यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील ३० अधिकारी व १५० अमंलदार नेमण्यात आले होते व संपुर्ण ऑल आऊटचे नेतृत्व  पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील स्वतः करुन नाकाबंदी, कोंबींग ऑपरेशन, ऑपरेशन ऑल आऊट बाबत जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना भेटी देत होते . पोलीस उप अधीक्षक ( मुख्यालय )  विश्वास वळवी , उप विभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार  सचिन हिरे , उप विभागीय पोलीस अधिकारी , शहादा श्रीकांत घुमरे , उप विभागीय पोलीस अधिकारी , अक्कलकुवा  एस . एस . सावंत , सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर असे सर्व आप – आपल्या पथकाचे नेतृत्व करुन कारवाई करीत होते . ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात २३ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती . सदर नाकाबंदी दरम्यान ११३ वाहनांची तपासणी करण्यात येवून २७ वाहनांवर कारवाई करण्यात आली .नंदुरबार जिल्ह्यात प्रलंबीत असलेल्या नॉनबेलेबल वॉरंटपैकी ७० नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करुन एकुण ३७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले , त्यात ११ आरोपी मयत झालेले होते , परंतु त्यांचा निश्चीत ठावठिकाणा व नातेवाईक यांची माहिती नसल्यामुळे न्यायालयाकडुन त्यांचेविरुध्द् नेहमी वॉरंट काढण्यात येत होते , अशा ११ मयत आरोपीचे नातेवाईक शोधुन त्यांचे मयताचे दाखले प्राप्त केले . तसेच १२ आरोपीतांनी न्यायालयात दंड भरुन वॉरंट रद्द केलेले होते असे समजून आले . त्याचप्रमाणे ६३ बेलेबल वॉरंटची बजावणी देखील करण्यात आली असुन ९२ समन्सची बजावणी करण्यात आली . यामध्ये नंदुरबार शहर , शहादा पोलीस ठाण्याचे अधिकार्‍यांनी नॉनबेलेबल वॉरंट बजाविण्यात पुढाकार घेतला. चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःचे अस्तीत्व लपवुन संशयास्पदरीत्या फिरत असतांना मिळुन आलेले १० रेकॉर्डवरील आरोपीतांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे विविध पोलीस ठाणेत गुन्हे दाखल करण्यात आले . त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आले . नवापुर पोलीस ठाणे हद्दीत एका संशयीत इसमाच्या ताब्यात चोरीची मोटर सायकल मिळुन आल्याने नंदुरबार जिल्ह्यातील ८१ हिस्ट्रीशीटर्स तपासण्यात आले तसेच ६२ हॉटेल ढाबे / लॉजेस तपासण्यात आला. १८ दारुबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे . त्यामध्ये १ लाख ७५ हजार ७३० रुपये किमंतीची देशी विदेशी दारु व बियर असा मुद्देमाल व ४ लाख रुपये किमंतीची अवैध दारुची वाहतुक करण्यात आलेली चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे . ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान कार्ली ता.जि. नंदुरबार येथील पोलीस ठाणे अभिलेखावरील मालमत्ते विरुध्दचा सराईत गुन्हेगार दादाभाई बाळु पाटील रा . कार्ली ता . जि . नंदुरबार याचा शोध घेवून त्यास विचारपुस केली असता त्याने त्याने सुमारे दिड ते दोन महिन्यापुर्वी नंदुरबार येथुन एक पाण्याचा टँकर चोरी केल्याची कबुली दिली .त्याच्याकडुन टँकर हस्तगत करण्यात आला . नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन गुन्हेगारांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन नागरीकांनी याबाबत समाधान व्यक्त करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले आहे . सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांच्या नेतृत्वाखाली  अपर पोलीस अधीक्षक विजय पवार ,  पोलीस उप अधीक्षक ( मुख्यालय )  विश्वास वळवी , उप विभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार  सचिन हिरे , उप विभागीय पोलीस अधिकारी , शहादा  श्रीकांत घुमरे , उप विभागीय पोलीस अधिकारी , अक्कलकुवा  एस . एस . सावंत , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर , सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अमंलदार यांनी केलेली असुन पुढील ३ दिवस ऑपरेशन ऑल आऊट ( कोंबींग व नाकाबंदी ) योजना संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे .

नंदुरबार पोलीस दलातर्फे जिल्हाभर कोंबींग आपरेशन राबविण्यात आले.  विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील स्वत: रात्रभर रस्त्यावर उतरुन कारवाई करीत होते.पाटील यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार,नंदुरबार डीवायएसपी सचिन हिरे, शहादा उपअधीक्षक श्री.घुमरे,अक्कलकुवा उपअधीक्षक संभाजी सावंत तसेच होम डीवायएसपी श्री.वळवी यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे सुमारे ३० अधिकारी व १५० कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

लोणखेडा येथे अल्पवयीन बालकाकडुन अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

Next Post

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक, मतदारांना भरपगारी सुटी किंवा सवलत द्यावी : जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अ. ज. रुईकर यांची आस्थापनांना सूचना

Next Post

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक, मतदारांना भरपगारी सुटी किंवा सवलत द्यावी : जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अ. ज. रुईकर यांची आस्थापनांना सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add