शहादा l प्रतिनिधी
नाशिक विभागीय शालेय योगासन स्पर्धा पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथे संपन्न झाल्या.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा तसेच नंदुरबार जिल्हा योग असोसिएशनच्या सहकार्याने नाशिक विभागीय शालेय योगासन स्पर्धा महात्मा गांधी सभागृह येथे उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस पाटील अध्यक्षस्थानी होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक संजयजी होळकर, प्रा.डॉ मयूर ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण महासंघ तथा सचिव नंदुरबार जिल्हा योगा संघटना, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.के. के. पटेल, पर्यवेक्षक प्रा. के. एच.नागेश, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एम. के.पटेल, प्रा.डॉ.एस.डी.सिंदखेडकर , जिल्हा क्रीडा कार्यालयाचे महेंद्र काटे,योग प्रशिक्षक प्रा.सुनिल पाटील, चेतन वाघ, स्पर्धा संयोजक प्रा.जितेंद्र माळी, व्ही. सी. डोळे,प्रा. अरविंद पाटील, अधीक्षक सुनिल भांडारकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी संगीताच्या तालावर सामूहिक योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय खेळाडू कीर्ती बोरसे या योगपटूने संगीताच्या तालावर दिप योगाच्या माध्यमातून (कपाळावर दिवा ठेऊन, दिवा पडू न देता आसने करणे) वेग-वेगळी आसने मान्यवरांच्या समोर सादर केली .
स्पर्धेत नाशिक मनपा, नाशिक ग्रामीण, मालेगाव मनपा, जळगाव मनपा, जळगाव ग्रामीण, धुळे मनपा, धुळे ग्रामीण आणि नंदुरबार जिल्हा अशा सात संघांनी सहभाग नोंदविला.
योगासन ही आपल्या देशाने विश्वाला दिलेली एक मोठी देणं आहे. योग साधना व योग अभ्यासा साठी संपूर्ण जगभरातील योग अभ्यासक भारतात येतात.आजच्या ताण-तणावाच्या जीवनात मनुष्याला एकाग्रता व मानसिक स्वास्थासाठी योगा व प्राणायाम करणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांनी केले.
यावेळी मार्गदर्शन करतांना संजय होळकर यांनी योगसाधना जीवनात महत्त्वाची आहे. यातून शालेय जीवनात निरोगी आरोग्य व सुदृढ शरीर हे आपल्याला योग साधनेतून मिळू शकते असा संदेश देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पंच म्हणून चेतन वाघ, सुनिल पाटील, शांताराम पाटील, सतीश नेमाडे, सुनंदा आहेर, पूनम इंगळे, तेजस्विनी चौधरी, नानासाहेब आडसरे यांनी काम पाहिले. यशस्वी स्पर्धकांचे मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. अरविंद कांबळे यांनी अभिनंदन केले.
स्पर्धेतील निकाल पुढील प्रमाणे
१४वर्षा आतील मुले
प्रथम: पार्थ शिंदे
द्वितीय: माणराज चौधरी
तृतीय: प्रेम शेलार
रिदमिक: पार्थ शिंदे
आर्टिस्टिक: प्रेम शेलार
१४वर्षा आतील मुली
प्रथम: नेहा पावर
द्वितीय: वंशिका मोराणकर
तृतीय:चैतन्य सूर्यवंशी
रिदमिक: रितुश्री सांकी
आर्टिस्टिक: नेहा पवार
१७वर्षा आतील मुले
प्रथम: पवन अहिरे
द्वितीय: विवेक अडसरे
तृतीय: मनीष अहिरे
रिदमिक,मनीष आहेर
आर्टिस्टिक: महेश वाघ
१७वर्षा आतील मुली
प्रथम: नंदिनी अंबेकर
द्वितीय: मानसी सोनवणे
तृतीय:हिरल सराफ
रिदमिक: मानसी सोनवणे
आर्टिस्टिक:सृष्टी सरोदे
१९वर्षा आतील मुले
प्रथम:रोहित कदम
द्वितीय:ओम जाधव
तृतीय:सार्थक पाटील
रीदमिक:रोहित कदम
आर्टिस्टिक:जय देवरे
१९ वर्षा आतील मुली
प्रथम:स्वानंदी वालझाडे
द्वितीय:पूर्वा अहिरे
तृतीय:नेहा चौधरी
रीदमिक:स्वानंदी वालझाडे
आर्टिस्टिक:तनिष्का खैरनार
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.मयूर ठाकरे यांनी केले.कार्यक्रमाचे सू्रसंचालन प्रा. मनोज चौधरी यांनी केले.
तर आभार प्रा. जितेंद्र माळी
यांनी मानले.स्पर्धा यशस्वितेसाठी गोपाल सोनार,संजय विसावे, दिलवर ठाकरे, हर्षल मोरे, दिनेश बागले, जगदीश वंजारी, वसीम शेख आदींनी परिश्रम घेतले.








