नंदूरबार l प्रतिनिधी
विसरवाडी येथील वीज वितरणाच्या 132 के व्ही विद्युत केंद्रात मोठी आग लागली. वीज उपकेंद्रातील ट्रांसफार्मर मध्ये मोठा विस्फोट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात आले. वीज वितरण कंपनीचे कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे धुळे6सुरत रस्त्यावर असलेल्या 132 के व्ही उपकेंद्रात काल भीषण आग लागली होती.शेजारी दोन पेट्रोल पंप असल्याने भीतीचे वातावरण झाले होते.क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
विसरवाडी येथील 132 के व्ही येथे विद्युत केंद्रातील याड मध्ये ट्रांसफार्मर 25 एम व्ही ए या यंत्राला एच व्ही बुशिंग फुटल्यामुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
ट्रांसफार्मर मध्ये ऑइल हा अग्निजन्य पदार्थ असल्यामुळे आगीचे क्षणातच रौद्र रूप धारण केले. आगीने सर्वत्र यंत्राच्या बाजूला ऑइल पसरल्यामुळे यात सर्वत्र ट्रांसफार्मर असल्यामुळे त्यात ऑइल जन्य पदार्थ हा आगीत पेट घेण्यासाठी मदत करत असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वत्र आग पसरत होती आगीचे धुराचे लोट लांब वरून दिसून येत होते.
संबंधित 132 केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्राचा वापर केला परंतु आगीची उष्णता तीव्र असल्यामुळे जवळ जाणे शक्य नसल्याने ते हतबल झाले
नवापूर तालुक्यात वीज पुरवठा करणा-या विसरवाडी येथील वीज उपकेंद्रात शनिवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वीज उपकेंद्रातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला आहे.
विसरवाडी येथील वीज केंद्राला आग लागल्यानंतर परिसरात मध्ये मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. आग विझवण्यासाठी नवापूर नगरपालिका अग्निशामक दलाला बोलवण्यात आले होते.








