नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत भुजगावची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली असून त्यात ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारू विक्री बंदीचा ठराव पारित करण्यात आला. दारू मुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत असून दारूच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंब उधवस्त झालेले आहेत तर अनेक कुटुंब त्या मार्गावर आहेत.
अनेक तरूण ब्लड प्रेशर सारख्या विकाराचे रुग्ण तयार झालेले आहे. अश्यातच ग्रामपंचायतीने पुढाकार घेत महिला सभेत दारूबंदीच्या विषयावर सखोल चर्चा होऊन महिला सभेत दारूबंदीच्या ठराव बहुमताने ठराव करत ग्रामसभेची मान्यता घेत महिलांनी तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे.
हरणखुरी व भुजगाव गाव दारूबंदी क्षेत्र घोषित करण्यात आले. या पुढे दारुची विक्री केल्यास त्यांच्यावर दारूबंदी अधिनियमानुसार कारवाई केली जाणार असा ठराव करण्यात आल्याचा ग्रामसभेचा ठराव ग्रामस्थांच्या स्वाक्षरीची प्रत पोलीस प्रशासनाला सुपूर्द करण्यात आली असून दारू विक्री करण्यास तात्काळ बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली.
असा घेण्यात आला होता ठराव
१) ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारू गाळून विक्री करण्यास बंदी घालण्यात आली.
२) ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारू पिऊन असभ्य वर्तन केल्यास,धिंगाणा घातल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार.
३) ग्रामपंचायत परिक्षेत्रात दारू विकण्याचा परवानाधारक दुकानांना ठराव देण्यास बंदी असेल.
४) गावात ग्रामपंचायत दारूबंदी ठरावाची जनजागृती करणार








