Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहाद्यात रंगली जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा

team by team
October 18, 2023
in शैक्षणिक
0
शहाद्यात रंगली जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा

नंदुरबार l प्रतिनिधी

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

 

 

 

स्पर्धेचे उद्घाटन सॉफ्टबॉल खेळाच्या साहित्याचे पूजन करून व नारळ वाळवून रुचिता ताई यांनी केले. यावेळी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी  संस्थेच्या संचालिका रुचिता पाटिल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती के.के.पटेल, उपप्राचार्य प्रा.डॉ.एम.के.पटेल, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.अरविंद कांबळे, पर्यवेक्षक के.एच.नागेश, क्रीडा शिक्षक प्रा.जितेंद्र माळी, प्रा.अपर्णा जोबनपुत्रा, प्रदीप पाटील, पवन महाजन, व्हि.सी.डोळे, एस.आर.पाटील, दिपक चौधरी उपस्थित होते. रुचिताताई पाटील म्हणाल्या की, अमेरिका बरोबरच युरोप खंडात व संपूर्ण जगभरात खेळला जाणारा हा खेळ नंदुरबार जिल्ह्यात देखिल अतिशय उत्तमरीत्या खेळला जातो याचे खरोखर कौतुक वाटते.

 

 

 

स्पर्धेत मुलींचा संघांचा समावेश बघून रूचीताताईंनी आनंद व्यक्त केला व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जिल्हास्तरीय स्पर्धेत २०२२-२३ वर्षी झालेल्या स्पर्धेत आलेल्या संघापेक्षा ह्या वर्षी संघांची संख्या वाढल्याने आनंद व्यक्त केला.

 

यशस्वी स्पर्धकांचे मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांनी अभिनंदन केले. प्रास्ताविक जितेंद्र माळी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.अरविंद कांबळे यांनी तर आभार पवन महाजन यांनी मानले. स्पर्धा यशस्वितेसाठी दिलवर ठाकरे, श्रीराम भंडारी, बबलू यादव, चेतन गोसावी, वंश दोढवे, अंकितकुमार यादव, हर्षल सोनवणे, गणेश यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

भारतात ऑलिम्पिक झाल्यास फ्रान्स सहकार्य करणार

Next Post

राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी सेंट मदर तेरेसा शाळेचा संघ सज्ज

Next Post
राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी सेंट मदर तेरेसा शाळेचा संघ सज्ज

राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी सेंट मदर तेरेसा शाळेचा संघ सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add