Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथील देवळफळी भागात गांधीगिरी करत नागरिकांनी स्वखर्चाने बुजले खड्डे

team by team
October 3, 2021
in सामाजिक
0
नवापूर येथील देवळफळी भागात गांधीगिरी करत नागरिकांनी स्वखर्चाने बुजले खड्डे
नवापूर l प्रतिनिधी
नवापूर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र 10 मधील देवळफळी भागात रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. नगरसेवक तथा विद्यमान उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे, अँड. अमित कांबळे,विजय कोकणी यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी करत  प्रभागातील नागरिकांनी स्वखर्चाने येथील खड्डे भरून संबंधित विभागा बाबत आक्रोश व्यक्त केला आहे
   राष्ट्रीय महामार्गला लागून औदयोगिक वसाहत ला जोडणारा एकमेव रस्ता असल्याने अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारा हा रस्ता गेल्या अनेक वर्षा पासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे नगर परिषद हद्द असल्याने ह्या रस्त्याकडे नगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे दोघं विभाग कानाडोळा करत दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनात येत आहे. पावसाळ्या पूर्वी रस्ता दुरुस्ती करणे अनिवार्य असतांना प्रशासना कडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे बघून स्थानिक नागरिकांनी प्रभागचे नगरसेवक विश्वास बडोगे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रपिता महात्मा  गांधी जयंती चे औचित्य साधत अनोखे आंदोलन करत खड्डे भरत  प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.यावेळी  राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण काम प्रगती पथावर असल्याने प्रभाग 10 मधील जवळ जवळ 67 घरे बाधित होणार आहे या कुटूंबावर बेघर होण्याची पाळी आली असल्याने स्थानिक नागरिकांनी 67 कुटूंबाना विस्थापित करण्याची मागणीसाठी  बेघर होणारे कुटूंब प्रमुखांनी आपली व्यथा मांडली ह्या वेळी उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे यांनी बेघर होणाऱ्या कुटूंबा साठी प्रशासनाच्या अधिकारी सोबत पत्रव्यवहार सुरू असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार चर्चा करणार असल्याचे सूतोवाच करत जमलेल्या बाधित होणाऱ्या कुटंबांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देत त्यांच्या साठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरून तीव्र  आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांचा मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,पो हे का निजाम पाडवी,चंद्रशेखर चौधरी,आदी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बातमी शेअर करा
Previous Post

दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तीन युवक ठार

Next Post

एस. ए. मिशन हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add