नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित जोगणीपाडा येथील आश्रम शाळेतील संपूर्ण संगणकीकृत डिजिटल लॅबचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते नुकतेच झाले.
अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जोगणीपाडा येथे नं.ता.वि.समितीचे अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी, संस्थेचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, नवनिर्वाचित पं. स. सभापती श्रीमती दिपमाला भिल यांच्या हस्ते डिजिटल रूमचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह वळवी, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी,पंचायत समिती सदस्या अंजना वसावे,धानोरा गावच्या सरपंच सौ. रीना पाडवी, उपसरपंच तानाजी वसावे,पंचायत समिती सदस्य सुनील वसावे, तेजस पवार,जोगणीपाडा येथील सरपंच सुनिल वळवी,कुवरसिंग वळवी, धानोरा व जोगणीपाडा ग्रामपंचायत व पिंपळोद ग्रामपंचायतचे आजी, माजी सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे आजी, माजी सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.डॉ.विठ्ठल काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य व्ही.ए.पाटील, मुख्याध्यापक जे.वाय.पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.








