नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथील ग्रामपंचायतीच्या मनसेच्या सरपंच रेखाबाई राकेश माळी यांच्या हस्ते नवाप्लॉट वस्तीतील क्रिकेट ग्राउंडचे उद्घाटन करण्यात आले. तसेच खेळाडूंना क्रिकेट व हॉलीबॉलचे साहित्य मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे सरपंच रेखाबाई राकेश माळी यांच्या वतीने खेळाडूंना साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नंदुरबार मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी यांच्या हस्ते खेळाडूंना क्रिकेट व हॉलीबॉलचे साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मनसेचे नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, योगेश पाटील, संग्राम भिल, कांतीलाल भिल, संदिप माळी, विठोबा माळी,अशोक माळी, प्रविण भिल, योगेश दशरथ माळी, योगेश भटु माळी, दिपक वाघ, दिनेश माळी, कमलेश भिल,प्रविण सुभाष ठाकरे, बादल ठाकरे, पवन खुशाल माळी, चेतन माळी, राहुल माळी, झुलाल भिल, कलाबाई भिल आदी उपस्थित होते.








