शहादा l प्रतिनिधी
श्री.पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन आणि विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळाच्या वतीने आयोजित किडनीरोग तपासणी शिबिरात 142 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

या शिबिरात सहभागी सर्वच रुग्णांची मोफत रक्त व लघवी तपासणी करण्यात आली. 80 रुग्णांना किडनी व मूत्रमार्ग आजार संबंधित निदान करण्यात आले आहे.त्यांना पुढील उपचारासाठी सल्ला देण्यात आला असून ज्यांना शस्रक्रिया करण्याची गरज पडेल अश्या रुग्णांवर अयोजकांतर्फे व्यवस्था करण्यात येणार आहे.पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुख्य सभागृहात अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि. 8 ते 10 आक्टोंबर रोजी मोफत भव्य किडनीरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील, सचिव प्रा. मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक उपस्थित होते. धुळे येथील सुप्रसिद्ध किडनीरोग तज्ञ डॉ.जितेंद्र चौधरी, तसेच डॉ. भावनेश चव्हाण यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात 142 रुग्णांची तपासणी करण्यात आली अशी माहिती आरोग्य शिबिराचे समन्वयक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी दिली.
शिबिरासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी स्वयंसेवक म्हणून सहकार्य केले. आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री.पी. के.अण्णा पाटील फाऊंडेशनचे सचिव प्रा. मकरंद पाटील,व्हि.एस.जी.जी.एमचे संचालक डॉ.प्रफुल्ल पाटील व सदस्य तथा विविध विद्या शाखांचे प्राचार्य , प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.








