Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील पहिली सामूहिक वन हक्क व्यवस्थापन व संवर्धन आराखड्यासाठी शिवारफेरीचे आयोजन

team by team
October 14, 2023
in राजकीय
0
जिल्ह्यातील पहिली सामूहिक वन हक्क व्यवस्थापन व संवर्धन आराखड्यासाठी शिवारफेरीचे आयोजन

नंदूरबार l प्रतिनिधी

 

 

धडगांव तालुक्यातील हरणखुरी येथे नुकतेच गावकऱ्यांनी सामूहिक वन हक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या 62 हेक्टर क्षेत्रावर गावाच्या विकासाकरिता सूक्ष्म नियोजन आराखडा तयार केला. वनाधिकार अधिनियम 2006 व 2008 अन्वये कलम 5 नुसार हरणखुरी गावाला सामूहिक वन हक्क मध्ये 62 हेक्टर वन जमीन मिलाळी आहे सदर जमिनीचे व्यवस्थापन करण्याची अधिकार गावाचा असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांचे प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सीएफआर समन्वयक अमोल राठोड आणि जिल्हा मूल्यांकन व सनियंत्रण अधिकारी संदीप गुसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले.

 

 

 

सर्व प्रथम गावाला सामूहिक वनहक्काचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर ग्रामसभाघेऊन सामूहिक वनहक्क समितीचे गठन करण्यात आले. तीन दिवसा आगोदर शिवारफेरीचे आयोजनासंदर्भात सामूहिक वन हक्क समितीचे बैठक घेण्यात आली. गावातील सर्व युवक सहभागी होते. त्यानंतर सायंकाळी महाराष्ट्र मध्ये सामुदायिक वनहक्क प्राप्त गावांमध्ये मेंढालेखा गावाचा यशस्वी गाथा पट दाखविण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी सामाजिक व आर्थिक सर्वे केले. गाव नकाशा काढून नियोजनाची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. गावकऱ्यांच्या सहभागाने विकास कामांचे नियोजन आराखडा तयार करून पुढील येणाऱ्या सहा वर्षाच्या काळात सदर गावाचे विकास करता येईल याबाबत विविध विभागांचे योजनांची सांगड घालून योजना कार्यान्वित करण्याबाबत नियोजन करण्यात आहे. या नियोजनाकरिता हरणखुरी येथिल सामुदायिक वनहक्क समिती कडून सर्व शासकीय यंत्रणांनी पत्र देऊन सूक्ष्मनियोजनाला उपस्थित राहुन या नियोजन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार वनविभागाकडून वनपाल,वनरक्षक, कृषी सहाय्यक,ग्रामसेवक, तलाठी,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, रोजगार सेवक, वनहक्क समन्वयक सह गावकरी महिला मंडळ बचत गटाचे सभासद मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

 

 

” एकात्मिक आदिवासी प्रकल्प तळोदा यांच्या अंतर्गत येणाऱ्या २३६ सामूहिक वन हक्क प्राप्त गावे आहेत, या तिन्ही तालुक्यातील आदिवासी यांच्या लाभासाठी, सामुहिक वन संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी तसेच वनांवर उपजीविका अवलंबून असलेल्या समाजाला शाश्वत साधन उपलब्ध करून देण्यासाठी सामुहिक वन हक्क व्यस्थापन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्या मार्फत सामुहिक वन हक्क क्षेत्राचे संवर्धन, संरक्षण, व्यवस्थापन व उपयोग करण्यासाठी आराखडा तयार करून गावातील लोकांना रोजगाराच्या संधी देण्याच्या उद्देश्याने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. आता शिवारफेरीचे आयोजन केले जात असून गावांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे”
मंदार पत्की,प्रकल्प अधिकारी तळोदा

 

 

” गावाला 62 हेक्टरचा सामूहिक वन हक्क प्राप्त झाला असुन सामुहिक वन संपत्तीचे व्यवस्थापन, समाजाला उपजीविकेचे शाश्वत साधन उपलब्ध व्हावी यासाठी समिती प्रयत्नशील असून प्रकल्पाच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांच्या पुढाकाराने नियोजन करत आहोत यात गावाचे मोठे योगदान ठरत आहे”
अर्जुन पावरा,सरपंच भुजगांव

बातमी शेअर करा
Previous Post

खान्देशरत्न दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खान्देशस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेला खेळाडूंसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

सहकारमहर्षी स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या जयंतीनिमित्त तपासणी शिबिरात 142 रुग्णांची तपासणी

Next Post
सहकारमहर्षी स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या जयंतीनिमित्त तपासणी शिबिरात 142 रुग्णांची तपासणी

सहकारमहर्षी स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या जयंतीनिमित्त तपासणी शिबिरात 142 रुग्णांची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add