नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे भीलीस्थान लायन सेनेचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
भीलीस्थान लायन सेनेच्या स्थापेला आज चार वर्ष पुर्ण झाले.या चार वर्षात भीलीस्थान लायन सेनेच्या वतीने जिल्ह्यातील विविध समस्यांना वाचा फोडण्यात आली.आज चौथ्या वर्धापण दिन कोरोनाच्या पार्श्वभुमिवर साध्या पध्दतीने केक कापुन साजरा करण्यात आला.यावेळी भारतीय किसान सेना प्रदेशाध्यक्ष पंडित तडवी, कार्याध्यक्ष सुभाष नेरकर, भारतीय किसान सेना प्रदेश संघटक सुरेश जगदेव, भारतीय किसान सेना जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी,भारतीय किसान सेना शहराध्यक्ष राजू माळी, अर्जुन वसावे, जगन वसावे, सुधाकर वसावे,सुनील भिल, दीपक भिल,अजय भिल आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.