Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संप मागे;माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांची मध्यस्थी

team by team
October 12, 2023
in राजकीय
0
अखेर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संप मागे;माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांची मध्यस्थी

नंदुरबार l प्रतिनिधी

शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मध्यस्थीने कंत्राटी तत्त्वावरील सफाई कामगारांनी संपातून माघार घेत आज गुरुवार पासून घरोघरी कचरा संकलनाचे कामकाज पूर्ववत सुरू करण्याचे कर्मचाऱ्यांनी मान्य केले आहे.

शहरातील एका दांपत्याने कंत्राटी तत्त्वावरील सफाई कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या निषेधार्थ गेल्या ३ दिवसांपासून सफाई कामगारांनी संप पुकारला होता.त्यामुळे शहरात घरोघरी कचरा संकलन होत नव्हता.स्वच्छतेच्या प्रश्न निर्माण झाल्याने अखेर शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी संपात सहभागी झालेल्या कामगारांशी भेट घेत चर्चा केली. यावेळी कामगारांमध्ये आणि माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्यात साधारणता पाऊण तास चर्चा होऊन अखेर कर्मचाऱ्यांनी संपातून माघारी घेत आज गुरुवारपासून कामकाज सुरू करणार असल्याची ग्वाही दिली.

कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

यावेळी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले,शहराच्या स्वच्छतेत सफाई कामगारांच्या मोठा वाटा आहे.कोरोना कालावधीत स्वच्छता कामगारांनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. कामगारांवर कुठलाही अन्याय होऊ देणार असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी अमोल बागुल, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक परवेज खान,माजी नगरसेवक रवींद्र पवार,सामाजिक कार्यकर्ते मोहितसिंग राजपूत उपस्थित होते.

पालिका सभागृहात सायंकाळी बैठक

शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सफाई कामगारांची भेट घेतली असता कामगारांनी समस्या मांडत मागण्या लावून धरल्या.स्वच्छता कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे,पगार वाढ करावी अशा मागण्यांच्या समावेश होता.दरम्यान,माजी आ.रघुवंशी यांनी आज गुरुवारी स्व.अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सायंकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्य सरकारने ‘टिस’ चाअहवाल जाहीर करावा, ट्रायबल फोरमचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Next Post

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी मोलगी तालुक्याची तात्काळ निर्मिती करा : आ.आमश्या पाडवी

Next Post
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी मोलगी तालुक्याची तात्काळ निर्मिती करा : आ.आमश्या पाडवी

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी मोलगी तालुक्याची तात्काळ निर्मिती करा : आ.आमश्या पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add