Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी मोलगी तालुक्याची तात्काळ निर्मिती करा : आ.आमश्या पाडवी

team by team
October 12, 2023
in राजकीय
0
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी मोलगी तालुक्याची तात्काळ निर्मिती करा : आ.आमश्या पाडवी

नंदूरबार l प्रतिनिधी

 

मोलगी तालुक्याच्या निर्मितीसाठी शासनाने साधलेला मुहुर्त आणि तारीख आल्यानंतर देखील सरकारने मोलगी तालुक्याचा प्रश्न रेंगाळत ठेवला परिणामी सातपुड्यातील आदिवासी बांधवांचा विकास खुंटला त्यामुळे आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी मोलगी तालुक्याची तात्काळ निर्मिती करा अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी अनुसुचित जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकीत केली.

गेल्या 5 वर्षा पासुन राज्यातील अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेची बैठक शासनाने घेतली नव्हती म्हणुन आदिवासींच्या सर्वांगिण विकासासाठी सदर परिषदेची बैठक होणे महत्वाचे होते यासाठी आमदार आमश्या पाडवी यांनी बैठक घेण्या संदर्भात विषय लावुन धरला होता. तीन वेळा शासनाने तारखा निश्चित करुन बैठका रद्द केल्या होत्या त्यामुळे आमदार आमश्या पाडवी यांनी थेट राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणुन दिली.

 

 

त्यानंतर शासनाने तातडीने दि.9 रोजी पत्र काढुन दि.11 रोजी बैठक घेत असल्याचे कळविले व सदर बैठक मंत्रालयातील पहिल्या परिषद सभागृहात संपन्न झाली. यावेळी आ. आमश्या पाडवी यांनी आदिवासी समाजाला बिंदु नामावली प्रमाणे मिळणारे आरक्षण, विद्यार्थ्यांना देण्यात येणारी डी.बी.टी. रद्द करावी ,आश्रम शाळातील विद्यार्थ्यांचा शाळांत होणारे मृत्यू, रोजगारासाठी जिल्ह्यात एम.आय.डी.सी. विकसित करावे, व आदिवासी उद्योजकांना निधीची व्यवस्था करावी.

 

 

पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीत पेसा क्षेत्रातील पात्र उमेदवार यांनाच घेण्यात यावे,टी.ई.टी. व पात्र उमेदवार न मिळाल्यास त्या जागी पेसा क्षेत्रातीलच उमेदवारांना संधी देण्यात यावी, आदिवासींची जमिन बिगर आदिवासींना देण्यात येऊ नये, बिगर आदिवासींनी आदिवासींच्या घेतलेल्या जमिनींच्या व्यवहारांची चौकशी करुन मुळ मालकाला परत कराव्या, बोगस आदिवासींना शासकीय सेवेत संरक्षण देऊ नये व सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे आदी सुमारे 35 मागण्यां सह आदिवासींचे विविध विषय व जिल्ह्यातील समस्या बैठकीत मांडल्या .

 

 

 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार आमश्या पाडवी यांनी दिली या बैठकीला उप मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजित पवार, आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या सह बैठकीला सर्व आदिवासी आमदार, खासदार तसेच सर्व विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव,प्रधान सचिव उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अखेर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संप मागे;माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांची मध्यस्थी

Next Post

खलील धोबी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

Next Post
खलील धोबी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

खलील धोबी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add