Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्य सरकारने ‘टिस’ चाअहवाल जाहीर करावा, ट्रायबल फोरमचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

team by team
October 12, 2023
in राजकीय
0
राज्य सरकारने ‘टिस’ चाअहवाल जाहीर करावा, ट्रायबल फोरमचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नंदूरबार l प्रतिनिधी

राज्य सरकारने ‘ टिस’ चा अहवाल जाहीर करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडे ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी केली आहे. यासंदर्भात नुकतेच निवेदन पाठविण्यात आले आहे.

राज्यातील मान्यता प्राप्त व तज्ञ संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी ‘ धनगर आदिवासी नाहीत ‘ हे स्पष्ट केल्यानंतरही केवळ राजकीय गणिते डोळ्यासमोर ठेऊन तत्कालीन महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाचा अभ्यास करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट आँफ सोशल सायन्सेस ( टिस ) मुंबई यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आलेली होती.

या संस्थेने धनगर समाजाचा अभ्यास करुन महाराष्ट्र सरकारकडे अहवाल सादर केलेला आहे.गेली अनेक वर्षे हा अहवाल खितपत पडून आहे.जनतेच्या पैशातून ह्या संस्थेला अभ्यास व अहवालाचे शुल्क देण्यात आले आहे.

धनगर समाजाच्या काही संघटनांनी बॉम्बे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ते आदिवासी असल्याचा दावा केलेला आहे. ह्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरु आहे. ह्या मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ( टीस ) ने बनवलेला अहवाल महत्वाचा ठरू शकतो परंतु महाराष्ट्र सरकारने कोर्टाला सांगितले की हा अहवाल उघड केला जाऊ शकत नाहीत.

दरम्यान महाराष्ट्र शासनाने ह्या प्रकरणात जी प्रतिज्ञापत्रे सादर केलेली आहेत त्या दोन्ही प्रतिज्ञापत्रात टीसच्या अहवालाचा संदर्भ दिलेला आहे. एकीकडे या अहवालाचा संदर्भ द्यायचा आणि दुसरीकडे तोच अहवाल जनतेसमोर आणण्यास टाळाटाळ करायची ही बाब परस्पर विसंगत ठरते.

महाराष्ट्रातील सध्या भटक्या विमुक्त समाजासाठी असलेल्या आरक्षणात ‘धनगर’ या एकट्या स्वतंत्र जातीसाठी साडेतीन टक्के आरक्षण आहे.

ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनाने कोणताही पक्षपात न करता आणि राजकीय नफा तोट्याचा विचार न करता टिसचा धनगर अहवाल जनतेसमोर उघड करण्याची मागणी ट्रायबल फोरम संघटनेने केली आहे.

उच्च न्यायालयाचेही आदेश

मुंबई उच्च न्यायालयात १२ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या सुनावणीत खुद्द न्यायालयाने धनगर आरक्षणाबाबत टिसचा अहवाल गोपनीय का ठेवता ?अहवाल न्यायालयात सादर करणार की नाही ? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्रात खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.असेही निवेदनात नमूद केले आहे.

धनगर आदिवासी नाहीत
महाराष्ट्र शासनाने १२ जून १९७९ रोजी थनगर समाजाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. यावर संबंधित विभागात सखोल चर्चा झाली होती. पण धनगर समाज आदिवासींचे निकष पूर्ण करु शकत नसल्यामुळे हा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आणि अखेर महाराष्ट्र शासनाने १९८१ मध्ये आपला प्रस्ताव मागे घेतला.

– नितीन तडवी जिल्हाध्यक्ष, ट्रायबल फोरम नंदुरबार

बातमी शेअर करा
Previous Post

‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ २.० राज्यात लागू

Next Post

अखेर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संप मागे;माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांची मध्यस्थी

Next Post
अखेर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संप मागे;माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांची मध्यस्थी

अखेर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संप मागे;माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांची मध्यस्थी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add