Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जागतिक टपाल दिनानिमित्त राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन

team by team
October 9, 2023
in राज्य
0
जागतिक टपाल दिनानिमित्त राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन

नंदुरबार l प्रतीनिधी

 

धुळे डाक विभागाअंतर्गत जागतिक टपाल दिनानिमित्त 9 ऑक्टोंबर ते 13 ऑक्टोंबर,2023 या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती धुळे विभागाचे डाकघर प्रवर अधीक्षक प्रताप सोनवणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 

 

राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त 9 ऑक्टोंबर ते 13 ऑक्टोंबर, 2023 या कालावधीत पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

असे आहेत सप्ताहातील कार्यक्रम
सोमवार, 9 ऑक्टोंबर, 2023 रोजी जागतिक टपाल दिनी सर्व प्रशासकीय व टपाल कार्यालयामध्ये स्वच्छता मोहीम राबवून, कार्यालय नीटनेटके आणि स्वच्छ दिसण्यासाठी जुने होर्डिंग, कालबाह्य नोटीस, सूचना काढण्यात येणार आहे.

 

मंगळवार, 10 ऑक्टोंबर, 2023 रोजी वित्तीय सशक्तीकरण दिवस साजरा केला जाईल. यात डाक समुदाय विकास कार्यक्रम (डाक चौपाल ) अंतर्गत भारतीय डाक विभागाच्या विविध बचत योजनांची माहिती देण्यासाठी व खाती उघडण्यासाठी धुळे विभागांतर्गत विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांचा सहभाग घेण्यात येणार आहे.

बुधवार, 11 ऑक्टोंबर, 2023 रोजी फिलाटेली दिवस साजरा केला जाईल. यात धुळे प्रधान डाकघर येथे शालेय मुलांचा सहभाग घेऊन फिलाटेली सेमिनार व प्रश्नमंजूषा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. तसेच या दरम्यान त्यांना तिकीटांचा संग्रह करण्यासंदर्भात व ‘ढाई आखर निबंध स्पर्धा’ या विषयी विस्तृत माहिती देण्यात येईल.

 

 

गुरुवार, 12 ऑक्टोंबर, 2023 रोजी मेल आणि पार्सल दिवस साजरा केला जाईल. या दिवशी सर्व पोस्ट मास्टर व वितरण कर्मचारी यांच्यासाठी धुळे विभागीय कार्यालय कार्यशाळेचे आयोजन करतील. तसेच ग्राहकांसाठी मेळाव्याचे आयोजन करुन त्यांना टपाल विभागातील वितरण प्रणाली विषयी माहिती देऊन त्यांचा अभिप्राय घेण्यात येईल.

 

 

शुक्रवार, 13 ऑक्टोंबर, 2023 रोजी अंत्योदय दिवस साजरा केला जाईल. या दिवशी ग्रामीण, दुर्गम भागात आणि शहरी झोपडपट्टयांमध्ये जनजागृतीसह आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण शिबीराचे आयोजन केले जाणार आहे. तसेच ग्राहकांना थेट लाभ हस्तांतरण, सामाजिक सुरक्षा पेन्शन, जन सुरक्षा योजना, सुकन्या समृद्धी खाती, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, आणि पोस्ट विभागाची इतर उत्पादने आणि सेवा यांच्या उपलब्धतेबद्दल जागरुक केले जाईल.

 

 

या सप्ताहांचा नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे विभागाचे प्रवर डाकघर अधीक्षक श्री. सोनवणे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

उद्या होणारी मुलाखत स्थगित : मंदार पत्की

Next Post

काकर्दे येथे शालेय व्यवस्थापन समितीची पुनर्रचना

Next Post
काकर्दे येथे शालेय व्यवस्थापन समितीची पुनर्रचना

काकर्दे येथे शालेय व्यवस्थापन समितीची पुनर्रचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add