नंदुरबार l प्रतिनिधी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळेत रिक्त पदावरील प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक यांची सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी उद्यातासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यासाठी 10 ऑक्टोंबर 2023 रोजी होणारी मुलाखत स्थगित करण्यात आली आहे.
या मुलाखतीचा दिनांक नंतर कळविण्यात येणार आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.









