नंदुरबार l प्रतिनिधी
मदत, पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्तीने राष्ट्रवादीतर्फे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीसह जल्लोष करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
ना. अनिल भाईदास पाटील यांची नंदुरबार जिल्हा पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून व पेढे भरऊन जल्लोषमय आनंद व्यक्त करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार शहराध्यक्ष मोहन माळी, राष्ट्रवादि काँग्रेस नंदुरबार तालुका अध्यक्ष मोंटू जैन, शहर कार्याध्यक्ष कमलेश चौधरी, ओबीसी सेल समन्वयक निलेश चौधरी यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.








