नंदुरबार l प्रतिनिधी
येथे झालेल्य टेनिस बॉल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत सुमारे १७ संघांनी आपला सहभाग नोंदविला. स्पर्धेला मिनी सब जुनिअर गटात १४ वर्षाखालील मुलांमध्ये ९ संघांचा तर सब ज्युनिअर गट सतरा वर्ष आतील मुलांमध्ये ८ संघांचा सहभाग होता. या स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली असून सदर निवड झालेले खेळाडू दि. १४ ते १६ ऑक्टोबर २०२३ दरम्यान हिंगोली येथे होणार्या राज्य स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्यावतीने हिंगोली येथे होणार्या मिनि सब ज्युनिअर व सब ज्युनिअर राज्य अजिंक्यपद स्पर्धा २०२३ साठी नंदुरबार जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्यावतीने नंदुरबार जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन यशवंत विद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा संघटक तथा जिल्हा सचिव डॉ.मयूर ठाकरे, आनंदा पाटील, क्रीडा शिक्षक भरत चौधरी, जितेंद्र माळी, आशिष घमंडे, मदन ठाकूर, आदी उपस्थित होते. स्पर्धेमध्ये १४ वर्षातील गटात चावरा इंग्लिश मीडियम शहादा या संघाने विजेतेपद पटकाविले तर अहिंसा पब्लिक स्कूल नंदुरबार यांनी उपविजेतेपद पटकावले. सतरा वर्षातील गटात गेम अँड संस स्पोर्ट्स क्लब विजेता तर चावरा इंग्लिश मीडियम नंदुरबार उपविजेतेपद पटकाविले. स्पर्धेत पंच म्हणून हर्षबोध बैसाणे, जगदीश वंजारी, हेमराज राजपूत, मनीष सनेर, योगेश माळी, आकाश माळी, अमोल चित्ते आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी दीपक अहिरे, मयूर पाटील, निलेश खलाणे, भूषण माळी, वर्षा पाटील आदींनी परिश्रम घेतले.








