Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

टेनिस बॉल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत १७ संघांचा सहभाग

team by team
October 4, 2023
in राज्य
0
टेनिस बॉल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत १७ संघांचा सहभाग

नंदुरबार l प्रतिनिधी

येथे झालेल्य टेनिस बॉल जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत सुमारे १७ संघांनी आपला सहभाग नोंदविला. स्पर्धेला मिनी सब जुनिअर गटात १४ वर्षाखालील मुलांमध्ये ९ संघांचा तर सब ज्युनिअर गट सतरा वर्ष आतील मुलांमध्ये ८ संघांचा सहभाग होता. या स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली असून सदर निवड झालेले खेळाडू दि. १४ ते १६ ऑक्टोबर २०२३ दरम्यान हिंगोली येथे होणार्‍या राज्य स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्यावतीने हिंगोली येथे होणार्‍या मिनि सब ज्युनिअर व सब ज्युनिअर राज्य अजिंक्यपद स्पर्धा २०२३ साठी नंदुरबार जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्यावतीने नंदुरबार जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन यशवंत विद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा संघटक तथा जिल्हा सचिव डॉ.मयूर ठाकरे, आनंदा पाटील, क्रीडा शिक्षक भरत चौधरी, जितेंद्र माळी, आशिष घमंडे, मदन ठाकूर, आदी उपस्थित होते. स्पर्धेमध्ये १४ वर्षातील गटात चावरा इंग्लिश मीडियम शहादा या संघाने विजेतेपद पटकाविले तर अहिंसा पब्लिक स्कूल नंदुरबार यांनी उपविजेतेपद पटकावले. सतरा वर्षातील गटात गेम अँड संस स्पोर्ट्स क्लब विजेता तर चावरा इंग्लिश मीडियम नंदुरबार उपविजेतेपद पटकाविले. स्पर्धेत पंच म्हणून हर्षबोध बैसाणे, जगदीश वंजारी, हेमराज राजपूत, मनीष सनेर, योगेश माळी, आकाश माळी, अमोल चित्ते आदींनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी दीपक अहिरे, मयूर पाटील, निलेश खलाणे, भूषण माळी, वर्षा पाटील आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

जी टी पाटील महाविद्यालयात ‘दृष्टी 2023’ चे उद्घाटन

Next Post

नंदूरबारच्या पालकमंत्री पदी अनिल पाटील यांची नियुक्ती, राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add