नंदुरबार l प्रतिनिधी
येथील जी टी पाटील महाविद्यालय इंग्रजी विभागामार्फत दृष्टी 2023 अंतर्गत न्यू ट्रेंड्स इन पब्लिक स्पिकिंग अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या विषयावर कार्यशाळेचे उद्घाटन क.ब.चौ. उ.म.वी जळगाव, मानवविद्या शाखेचे अधिष्ठता प्राचार्य डॉ ए. पी. खैरनार यांच्या हस्ते संपन्न झाले.
दृष्टी हा उपक्रम नंदुरबार तालुका विधायक समितीचे माजी अध्यक्ष लोकनेते कै. बटेसिंग रघुवंशी यांच्या स्मृति प्रित्यर्थ आयोजित करण्यात येतो. उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक प्राचार्य खैरनार यांनी नवीन शैक्षणिक धोरण चे अवलंबन व त्यात लोक संभाषण व सादरीकरण कौशल्य याची अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासाठी आत्मविश्वास हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी दृष्टी सारख्या उपक्रमांचा फायदा घ्यावा असे प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व क ब चौक चे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ महेंद्र रघुवंशी यांनी आपल्या मंथनात विद्यार्थ्यांनी काळासोबत स्वतःमध्ये बदल घडवून आणणे अपेक्षित आहे.
21 व्या शतकात नवनवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी भाषा कौशल्य महत्त्वाचा दुवा असेल असा कानमंत्र दिला. संस्थेचे समन्वयक डॉ एम एस रघुवंशी यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यक्तिमत्व विकास च्या संधी उपलब्ध आहेत त्याचा विद्यार्थ्यांनी अंतर्मुख होऊन फायदा घ्यावा असे प्रतिपादन केले.
व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा निलेश सोमानी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा डी डी गिरासे यांनी केले तर आभाप्रदर्शन डॉ विजय चौधरी यांनी केले या दोन दिवसीय कार्यशाळेत लोक संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकास या विषयांवर डॉ विजय चौधरी व डा दिनेश देवरे हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा चेतन सोनवणे व प्रा सचिन आढावे यांनी केले.








