नंदुरबार l प्रतिनिधी
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाडा अंतर्गत सामान्य जनतेला दुर्धर आजारावरील मोफत उपचार देण्यासाठी तसेच अत्यंत महागड्या अशा विविध शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टी च्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
तरी नंदुरबार जिल्ह्यातील समस्त गरीब गरजू रुग्णांनी व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा आणी सुरत येथील हर्षल सर्जिकल हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, एक्सीडेंटल ट्रॉमा सर्जरी, न्यूरो सर्जरी, ऑर्थोपेडिक सर्जरी, वास्कुलर सर्जरी, कॅन्सर निदान व ऑपरेशन, प्लास्टिक सर्जरी गॅस्रोयोइंटेस्टीनल सर्जरी आदी विविध संबंधीत त्यासाठी तज्ञ डॉक्टर्स उपस्थीत राहणार आहेत.
1 ऑक्टोंबर 2023 रविवार रोजी सकाळी 9 ते 4 वा पर्यंत श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी डी आर हायस्कूल येथे या तपासण्याचे शिबिर पार पाडले जाईल. गाव पातळीवरचे तसेच शहर तालुका कमिट्यांमधील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या माध्यमातून संपर्क करण्यात आला असून मोठा प्रतिसाद नक्कीच मिळेल असा विश्वासही या प्रसंगी विजय चौधरी यांनी व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सपना अग्रवाल, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षल पाटील उपस्थित होते.








