Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सेलंबा येथे तणावपूर्ण शांतता,दोन समुदायात दगडफेक

team by team
September 30, 2023
in क्राईम
0
सेलंबा येथे तणावपूर्ण शांतता,दोन समुदायात दगडफेक

खापर l प्रतिनिधी

 

महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमा वरती भागात असलेल्या सागबारा तालुक्यातील सेलंबा या गावात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने काढण्यात आलेल्या शौर्य जागरण मिरवणुक यात्रेत दगळफेक झाल्याची घटना काल (ता.२९) रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली आहे.

 

 

या घटनेत दहा ते अकरा जणांना दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व नियंत्रणानंतर तणावपूर्ण शांतता आहे.

 


विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने दक्षिण गुजरात शौर्य जागरण यात्रा निमित्त कुयदा या परिसरातुन सेलंबा या गावात (ता.२९) सकाळी साडेदहाच्या सुमारास मिरवणूक दाखल होत असतांना येथील अल्पसंख्याक प्रार्थना स्थळाजवळ मिरवणूक रथावर काही समाज कंटकाकडुन दगळफेक झाली.ज्याचे रूपांतर दोन समुदायात धुमश्‍चक्रीत झाले.याघटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही,

 

 

 

 

परंतु दहा ते बारा जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.तसेच एका कटलरी व स्टेशनरी दुकानाची जाळपोळ झाल्याने दुकानातील माल जळून खाक झाले तर टेलरींग,मोबाईल,फळे आदी दुकानांचे नुकसान झाले आहे.पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला व तणावपूर्ण शांतता आहे.घटने मागील दोषींचा तपास सुरू आहे.व अफवांवर विश्वास न ठेवण्याचा नर्मदा पोलीस अधीक्षक प्रशांत सुंबे व सागबारा पोलीस उपनिरीक्षक पी.व्ही.पाटील यांच्याकडुन करण्यात येत आहे.

 

 

सेलंबा येथे निघालेल्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने आयोजित शौर्य जागरण यात्रा मिरवणुकीत काही समाज कंटकाकडुन दगळफेक करण्यात आली,त्यामुळे दोन समुदायात तणावाचे वातावरण निर्माण झाले.घटनेस्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून तणावपूर्ण शांतता आहे.घटनेत जाळपोळ व तोडफोड झालेल्या दुकानांचे पंचनामे करत आहे,घटने मागील दोषींचा शोध घेण्यात येत आहे. दोषींवार योग्य ती कारवाई करण्यात येईल.

प्रशांत सुंबे,
पोलीस अधीक्षक जिल्हा नर्मदा (गुजरात)

 

 

 

गुजरात राज्यातील सेलंबा हे गाव महाराष्ट्र सीमेलगत असल्याने अफवांना बळी पडून त्यांचे पडसाद अक्कलकुवा तालुक्यात उमटू नये म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे व पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडूनये म्हणून चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हास्तर जलतरण व डायव्हींग स्पर्धा उत्साहात

Next Post

दुष्काळ परिस्थितीमुळे सैताने येथील शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

Next Post
दुष्काळ परिस्थितीमुळे सैताने येथील शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

दुष्काळ परिस्थितीमुळे सैताने येथील शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रभाग 5 मधील रस्ता डांबरीकरण कामाचे शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

January 25, 2026
श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

श्रॉफ हायस्कूलमध्ये ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान

January 25, 2026
रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

रोहयो’ कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, काळ्या फीत लावून शासनाचा केला निषेध

January 25, 2026
राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

राष्ट्रीय तेंग सु डो कोरियन कराटे स्पर्धेत निखिल पाटीलने पटकावले रौप्य पदक

January 25, 2026
चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

चिपलीपाड्यात रब्बी शेतीचा जागर; कृषी तज्ज्ञांनी दिला शाश्वत शेती’चा मंत्र

January 25, 2026
नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

नंदुरबार येथे भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर

January 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add