नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बर्डीपाड्याचा धरणात दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत बर्डीपाडा धरणात आर्यन गोरख वळवी इयत्ता सातवी, वय 14 वर्ष प्रीतम गोरख वळवी इयत्ता चौथी वय 12 वर्ष असे दोघे सख्खे भाऊ त्यांचा शेतालगत धरणात गेले असता धरणाचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघ्या सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून वाचवण्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती गावात पसरल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी व खांडबारा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली दोघे सख्या भावांचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी प्रचंड आक्रोश केला.








