नंदुरबार l प्रतिनिधी
स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत स्वच्छतेसाठी १ ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती अंतर्गत ‘एक तारीख एक तास श्रमदान ‘ ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या श्रमदान मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार यांनी केले आहे .
देशभरात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 दरम्यान स्वच्छता ही सेवा हा उपक्रम सुरू आहे . स्वच्छतेबाबत जनजागृती होऊन त्याचे रूपांतर जनआंदोलनात व्हावे यासाठी केंद्र शासनातर्फे १ ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी १० वाजता ‘एक तारीख एक तास श्रमदान ‘ या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे .
नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी व ग्रामीण भागात स्वच्छतेसाठी श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे .या श्रमदान मोहिमेत सर्व बचत गट ,युवक मंडळ ,स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी ,शासकीय , निमशासकीय अधिकारी ,कर्मचारी ,ग्रामपंचायत स्तरावरील सर्व पदाधिकारी ,पाणी व स्वच्छता समितीचे सदस्य ,विद्यार्थी यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे .श्रमदान मोहिमेत शहरी व ग्रामीण भागातील सर्व आरोग्य केंद्र , बाजारपेठ ,शाळा ,अंगणवाडी , दवाखाना , रस्ता ,बसस्थानक , रेल्वे स्थानक ,पर्यटन व धार्मिक स्थळे यांची स्वच्छता करण्यात येणार आहे .
‘एक तारीख , एक तास श्रमदान ‘ चा मोहिमेत स्वच्छतेसाठी श्रमदानाबरोबरच स्वच्छता प्रतिज्ञा , स्वच्छता रॅली , प्लास्टिक वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे .
जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी ,सरपंच , शासकीय ,’निम -शासकीय कर्मचारी , यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहान मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम.डी .धस यांनी केले आहे .








