नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातुन हदपार करण्यात आलेले ४ आरोपी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील अथवा न्यायालयाची कुठलीही पुर्व परवानगी न घेता नंदुरबार जिल्ह्यात मिळुन आल्याने. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हे दाखल करून अटक केली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक -२०२१ व नवरात्रोत्सव काळात जिल्ह्यात कायद व सुव्यवस्था अबाधीत रहावी करीता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे यापुर्वी नंदुरबार जिल्ह्यातुन २ वा कालावधीसाठी दोन टोळ्यांमधील १४ आरोपी व १ वर्ष कालावधीसाठी एका टोळीतील ५ आरोपी तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे ४ आरोपी असे एकुण २३ आरोपीतांना नंदुरबार जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले आहे . हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीतांना नंदुरबार जिल्हा बाहेर गुजरात राज्यात त्यांचे नातेवाईकांक सोडण्यात आले होते , परंतु त्यातील काही सराईत गुन्हेगार हे नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी.आर.पाटील यांची कुठलीही परवानगी न घेता वावरत असल्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबारचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती . त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी.आर.पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजर पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या एक स्वतंत्र पथक तयार करुन त्यात मालाविरुध्द गुन्हे करणारे हद्दपार आरोपी संतोष दिलीप तिजविज रा . बाहेरपुरा , नंदुरबार हा दि. ५ सप्टेंबर रोजी तर महेंद्र धरम ठाकरे रा . डामरखेडा ता . शहाद हा दि. २८ सप्टेंबर रोजी रोजी, गोरख मोहन ठाकरे रा . डामरखेडा ता . शहादा,महेंद्र धरम ठाकरे रा . डामरखेडा, ता . शहादा हे दोन्ही द. ३० सप्टेंबर रोजी रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील अथवा न्यायालयाची कुठलीही पुर्व परवानगी न घेता नंदुरबार जिल्ह्यात रात्रीचे सुमारास मिळुन आल्याने. त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे नंदुरबार शहर व शहादा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे . शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक राकेश मोरे , राकेश वसावे , विकास कापुरे , पुरुषोत्तम सोनार , मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार विजय ढिवरे , किरण मोरे, अभय राजपुत, आनंदा मराठे , यशोदिप ओगले यांचे पथकाने केली.