नंदुरबार l प्रतिनिधी
शासकीय तांत्रिक विद्यालय नंदुरबार व अक्कलकुवा येथील सफाईगार प्रत्येकी १ पद अशी एकूण दोन पदे ठेका पद्धतीने अकरा महिन्यासाठी भरण्याकरीता जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थानी ५ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार यांच्याकडे सादर करावे,
असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वि. रा. रिसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.








