नंदुरबार l प्रतिनिधी
धुळे येथे आज 25 सप्टेंबर 2023 रोजी पार पडलेल्या धुळे जिल्हा दिशा समितीच्या बैठकीत विविध केंद्रीय योजनांच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी पंतप्रधान आवास योजना आणि जल मिशन योजनेच्या अपूर्णता आढळलेल्या कामांमध्ये दुरुस्त्या करण्याचे आदेश भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्त्या तथा नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा. डॉ. हिना विजयकुमार गावित यांनी दिल्या.

धुळे जिल्हा दिशा समितीची बैठक आज दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष धुळे लोकसभा मतदारसंघाचे खा.डॉ.सुभाष भामरे हे होते तर सहअध्यक्ष म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ. हिना गावित त्या ठिकाणी उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये केंद्र सरकार पुरस्कृत असलेल्या सर्व योजनेचा आढावा घेण्यात आला. केंद्र सरकारच्या जवळपास 23 वेगवेगळ्या योजनेचा सविस्तर आज या बैठकीमध्ये घेण्यात आला. उर्वरित 21 योजनेचा आढावा हा पुढच्या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. पुढची बैठकी लवकरच घेण्यात येईल, असे या बैठकीत सांगण्यात आले.
दरम्यान, या बैठकीमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काही गावांमधील लाभार्थ्यांची दुसऱ्या गावात ऑनलाईन एन्ट्री झालेली आढळली. त्याविषयीच्या तक्रारी विचाराधीन घेण्यात आल्या. त्यात तातडीने सुधारणा करावी, असे आदेश देण्यात आले.
जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा नळ योजनेचे काही ठिकाणी आराखडे व्यवस्थित न तयार केल्यामुळे गावातला काही भाग हा पाणीपुरवठा योजनेपासून सुटलेला आहे; अशा प्रकारच्या तक्रारी खासदार डॉक्टर हिना गावित यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यावर त्या गावांमध्ये डिटेल सर्वे करून पूर्ण शंभर टक्के गावाला पाण्याची व्यवस्था व्हावी असे आदेश दिले.








